आळंदी, (वार्ताहर) – श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्था संचलित श्री ज्ञानेश्वर प्राथमिक विद्यामंदिर, आळंदी देवाची प्रशालेच्या इयत्ता पहिली ते चौथी वर्गांची शासकीय नियमानुसार पालकसभा आयोजित करण्यात आली होती.
पालकसभेत अभ्यासक्रम, शालेय कामकाज, सहशालेय उपक्रम, विविध समित्या आणि त्यांची कार्ये आदीबद्दल माहिती देण्यात आली. प्रत्येक वर्गाच्या पालकांमधून प्रतिनिधींची निवड करण्यात आली.
पदसिद्ध अध्यक्ष मुख्याध्यापक प्रदीप काळे यांच्या अध्यक्षतेखाली नवीन कार्यकारणीची सभा झाली. निवडलेल्या प्रतिनिधीमधून संघाच्या उपाध्यक्षपदी डॉ. विवेक चव्हाण यांची तर प्रशालेच्या शिक्षिका प्रतिभा भालेराव यांची सचिव म्हणून व कामिनी मुंडे यांची सहसचिव म्हणून निवड करण्यात आली.
यावेळी संस्थेचे सचिव अजित वडगावकर, खजिनदार डॉ. दीपक पाटील, ज्येष्ठ विश्वस्त एल.जी घुंडरे यांनी निवड झालेल्या पदाधिकार्यांचे अभिनंदन केले.
अजित वडगावकर यांनी आतापर्यंत पालकसंघाने संस्था व शाळेच्या विकास कार्यात वेळोवेळी मदत, सहकार्य केले आहे, इथून पुढेही सहकार्य, मदतीची अपेक्षा व्यक्त करत शुभेच्छा दिल्या. डॉ. दीपक पाटील यांनी पालकसंघाच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या .