Entertainment । अभिनेता विजय देवरकोंडाचा आगामी चित्रपट ‘VD 12’ सध्या चांगलाच चर्चेत आहे. आगामी चित्रपटांमध्ये ‘VD 12’ आणि ‘VD 14’ यांचा समावेश आहे. विजयसोबतच त्याचे चाहतेही त्याच्या पुढच्या हिट चित्रपटाची वाट पाहत आहेत. दरम्यान, आता ‘VD 12’ च्या शूटिंगबाबत एक मोठे अपडेट समोर आली आहे.
‘VD 12’ चित्रपटाचे शूटिंग चांगलेच चर्चेत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विझागमध्ये चित्रपटाचे एक महिन्याचे शेड्यूल पूर्ण झाले असून आता पुढील शेड्यूलची तयारी सुरू झाली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ‘VD 12’ चे पुढील शेड्यूल श्रीलंकेत शूट होणार आहे.
‘VD 12’ चे शूटिंग श्रीलंकेत जवळपास महिनाभर सुरू राहणार असल्याचे बोलले जात आहे. या कालावधीत चित्रपटाचे चित्रीकरण श्रीलंकेतील विविध शहरांमध्ये होणार आहे. या शेड्युलमध्ये काही ॲक्शन सीन्सही चित्रित करण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे.
‘VD 12’ चे दिग्दर्शन गौतम तिन्ननुरी करत आहे. हा एक थ्रिलर चित्रपट असेल. विजय देवरकोंडाची पूर्णपणे वेगळी शैली चित्रपटात पाहायला मिळणार आहे. ‘VD 12’ या वर्षाच्या अखेरीस रिलीज होणार असल्याची चर्चा आहे. चित्रपटाची निर्मिती सितारा एंटरटेनमेंट्स आणि फॉर्च्युन फोर सिनेमाज करत आहे.
‘VD 12’ च्या कलाकारांबद्दल सांगायचे तर, अभिनेत्री भाग्यश्री बोरसे देखील विजय देवरकोंडा सोबत दिसू शकते. या चित्रपटात विजय आणि भाग्यश्रीची केमेस्ट्री चर्चेत आली आहे. अनिरुद्ध रविचंदर या चित्रपटाला संगीत देत आहे. 9 मे 2023 रोजी विजय देवरकोंडा यांच्या वाढदिवसाला या चित्रपटातील त्याचा फर्स्ट लुक रिलीज झाला होता.