Entertainment । साऊथचा सुपरस्टार सूर्या आणि बॉलिवूड अभिनेता बॉबी देओलही त्याच्या आगामी ‘कांगुवा’ या चित्रपटामुळे बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. अनेक दिवसांपासून चाहते या चित्रपटाची वाट पाहत आहेत. नुकतीच निर्मात्यांनी या चित्रपटची रिलीज डेट सांगितली.चित्रपटाच्या कास्टने दसऱ्याच्या मुहूर्तावर १० ऑक्टोबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याची माहिती दिली. या चित्रपटात मुख्य अभिनेत्रींच्या भूमिकेत दिशा पटानी देखील दिसणार आहे.
अशात आता हा चित्रपट अभिनेत्री आलिया भट्टच्या चित्रपटाशी क्लैश होणार आहे. कारण आलियाचा जिगरा चित्रपट सुद्धा याच दिवशी रिलीज होणार आहे. हे दोन्ही बिग बजेट चित्रपट एकाच दिवशी रिलीज होणार असल्यामुळे आता कोणत्या चित्रपटाला प्रेक्षक जास्त प्रतिसाद देतात याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. सोशलवर या दोन्ही चित्रपटाच्या रिलीज डेट वरून चर्चा रंगली आहे. युजर्सकडून कुठला चित्रपट बॉक्स ऑफिसवर किती कमाई करणार यावर अंदाज वर्तवला जात आहे.
‘कंगुवा’चे दिग्दर्शन शिवाने केले आहे. या वर्षी प्रदर्शित होणाऱ्या मोठ्या चित्रपटांपैकी हा एक मानला जात आहे. या चित्रपटाचे बजेट 350 कोटी रुपये आहे. या ॲक्शन ड्रामा चित्रपटात बॉबी देओल नकारात्मक भूमिकेत दिसणार आहे. हा देखील बॉबी देओलचा साऊथ सिनेमातील डेब्यू सिनेमा असणार आहे. याआधी त्याने साऊथच्या कोणत्याही चित्रपटात काम केलेले नाही.
तर आलिया भट्टचा आगामी चित्रपट ‘जिगरा’ निर्माता करण जोहरच्या प्रोडक्शन हाऊस धर्मा प्रोडक्शनच्या बॅनरखाली तयार करण्यात आला आहे. करणसोबत आलियाचा हा आणखी एक चित्रपट असेल. या चित्रपटात आलियासोबत वेदांग रैना दिसणार आहे.