Legislative Assembly Session| महाराष्ट्राच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. मुंबईत 27 जून ते 12 जुलै या कालावधीत हे अधिवेशन होणार आहे. त्यादरम्यान आज अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी आर्थिक वर्ष 2023-24चा महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल सभागृहात सादर केला.
फेब्रुवारीमध्ये महायुती सरकारने राज्याचा पहिला अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. परंतु त्यावेळी राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल सादर केला नव्हता. हा अहवाल आज सादर केला असून त्यानुसार महाराष्ट्राची अर्थव्यवस्था 7.6 टक्क्यांनी वाढेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
राज्याच्या कृषी तसेच कृषीपुरक क्षेत्रातही1.9 टक्क्यांची वाढ अपेक्षित आहे. तर राज्याचं स्थूल उत्पन्न 40 लाख 44 हजार कोटींपर्यंत जाण्याचा अंदाज आहे. पीक क्षेत्रात देखील वाढीची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. तर राज्याच्या उद्योगात 7.6 टक्के आणि सेवा क्षेत्रातही 8.8 टक्के वाढीचा अंदाज आहे. Legislative Assembly Session|
देशांतर्गत उत्पन्न २९३.९० लाख कोटी रुपये असून त्यात २०२२-२३ च्या तुलनेत ९.१ टक्के वाढ अपेक्षित आहे. २०२३-२४ मध्ये देशाचं दरडोई उत्पन्न १,८३,२३६ रुपये होते. २०२२-२३ मध्ये दरडोई उत्पन्नाच्या बाबतीत तेलंगणा राज्य देशात प्रथम क्रमांकावर आहे. तर महाराष्ट्र सहाव्या क्रमांकावर आहे. Legislative Assembly Session|
दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर महायुती सरकार पावसाळी अधिवेशनाला सामोरं जात आहे. आज अधिवेशनाचा पहिला दिवस आहे. या अधिवेशनात नीट परीक्षा रद्द, पोलिस भरती रद्द, पुण्यातील अंमली पदार्थ, शेतकरी कर्जमाफी, कांदा प्रश्न यासारखे विविध मुद्दे उपस्थित करत विरोधक सरकारची कोंडी करण्याची शक्यता आहे.