पुणे : कौटुंबिक न्यायालयातील वकिलांची संघटना असलेल्या द फॅमिली कोर्ट लॉयर्स असोसिएशन, पुणेच्या वार्षिक निवडणूकीचे अंतिम चित्र स्पष्ट झाले आहे. अध्यक्ष पदासाठी दुहेरी लढत होणार आहे. विद्यमान अध्यक्ष ॲड. वैशाली चांदणे आणि माजी अध्यक्ष ॲड. गणेश कवडे यांच्यात ही निवडणूक होणार आहे.
२८ जून रोजी सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत मतदान होणार असून, त्याच दिवशी सायंकाळी मतमोजणी होऊन निकाल ॲड.अमृता गुरव देशमुख या निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहत आहेत.
वैशाली चांदणे अध्यक्ष पदासाठी उमेदवार असलेल्या समता पॅनेलकडून उपाध्यक्ष पदासाठी ॲड. प्रगती पाटील, ॲड. सिध्दार्थ देशपांडे, सचिव पदासाठी ॲड. झाकीर मणियार, सहसचिव पदासाठी ॲड. विजय सरोदे, खजिनदार पदासाठी ॲड. अनिशा फणसाळकर, तर सदस्य पदासाठी ॲड.सुप्रिया घाटपांडे-रिसबुड, ॲड. मंजु लुनिया, ॲड. मेमन तसलीम, ॲड.नम्रता भिलारे आणि ॲड. विष्णू खरात निवडणूक रिंगणात आहेत.
तर गणेश कवडे अध्यक्ष पदासाठी उमेदवार असलेल्या एकता परिवर्तन पॅनेलकडून उपाध्यक्ष पदासाठी ॲड. स्मिता देशपांडे, ॲड. कल्पना निकम, सचिव पदासाठी ॲड. प्रथमेश भोईटे, सहसचिव पदासाठी ॲड. कोमल देशमुख, खजिनदार पदासाठी ॲड. भूषण कुलकर्णी, सदस्य पदासाठी ॲड. अश्मा मुलाणी, ॲड.अजित कदम, ॲड. जुही कुरेशी, ॲड. शर्वरी भंडारी आणि ॲड. राहुल जाधव-देशमुख निवडणूक लढत आहेत