Maharashtra Assembly Monsoon Session 2024| राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. त्यानंतर विरोधकांकडून अर्थसंकल्पावर टीका करण्यात आली. आज राज्य विधीमंडळाच्या अधिवेशनाचा तिसरा दिवस आहे. त्यादरम्यान विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर घोषणाबाजी करण्यात आली. तर सत्ताधाऱ्यांनी देखील विरोधकांवर घोषणाबाजी केली. त्यामुळे दोघेही आमने-सामने आल्याचे पाहायला मिळाले.
‘महायुती सरकारचा शेवटचा अर्थसंकल्प म्हणजे तिजोरीत खळखळाट अन् थापांचा सुळसुळाट’, ‘जब चद्दर लगी फटने, खैरात लगी बटने’, अशा घोषणा विरोधकांकडून देण्यात आल्या. यावेळी विरोधकांच्या हातात विविध पोस्टर दिसून आले. तसेच प्रत्यक्षात निधींची वानवा, वरून खैरातीचा गारवा. खिशात नाही आणा, मला बाजीराव म्हणा, अशा घोषणांनी विरोधकांनी विधानभवन परिसर दणाणून सोडला.
आंदोलनावेळी जितेंद्र आव्हाड यांच्या हातात विठ्ठल रुखुमाईची मूर्ती होती. या घोषणांनी आज विधानभवनाचा परिसर दणाणला. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर आज जोरदार निदर्शने करत महायुतीच्या अर्थसंकल्पाची पोलखोल केली.
अर्थसंकल्प विश्लेषण थोडक्यात..
खिशात नाही दाणा अन मला बाजीराव म्हणा…#Budget2024 #AssemblySession #Vidhansabha #MaharashtraAssembly #पावसाळीअधिवेशन२०२४ #महाराष्ट्रसरकार #shindefadnavissarkar #bjp #maharashtra #incmaharashtra #Maharashtrapolitics pic.twitter.com/CfLRrqKDDf— Maharashtra Congress (@INCMaharashtra) June 29, 2024
‘लोकसभा निवडणुकीचा घेतला धसका, विधानसभेला मस्का’, भाऊ म्हणून दाखवलं महिलांना योजनांचे भूल, महिलाच करतील निवडणुकीत गूल, निधीची वनवा आणि खैरातीचा गारवा, लुटारू सरकार हाय हाय, 40 टक्के कमिशन घेणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, अशा जोरदार घोषणा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी दिल्या. तर सत्ताधारी पक्षांकडून विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन करण्यात आले. Maharashtra Assembly Monsoon Session 2024|
सत्ताधाऱ्यांकडूनही घोषणाबाजी
सत्ताधाऱ्यांकडून उद्धव ठाकरे यांच्यावरील व्यंगचित्रातून ‘किस्सा कुर्सी का?’ असे म्हणत टीका करण्यात आली. एक आघाडी बारा भानगडी, गांव बसा नही लुटेरे आ गए, अशा जोरदार घोषणाही सत्ताधाऱ्यांकडून देण्यात आल्या.
हेही वाचा:
लडाखमध्ये टँक सरावादरम्यान मोठी दुर्घटना ; नदी ओलांडताना पाण्याची पातळी वाढली, जेसीओसह 5 जवान शहीद