टाकळीभान, (वार्ताहर) – श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथील जगद्गुरुcccनिर्माण कार्यासाठी उपसरपंच कान्हा खंडागळे कुटुंबीयांकडून ५५ हजार ५५५ रुपये वर्गणी देण्यात आली.
टाकळीभान येथे जगदगुरू संत तुकाराम महाराज मंदिराचे बांधकाम लोकवर्गणीमधून सुरूअसून, या मंदिर निर्माण कार्यासाठी कान्हा खंडागळे यांनी त्यांची स्व.आई, आजी, आजोबा व चुलते यांच्या स्मरणार्थ जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज मंदिराच्या सेवेकरी मंडळीकडे ५५ हजार ५५५ रुपयांचा धनादेश सुपूर्द केला आहे.
यावेळी कान्हा खंडागळे कुटुंबाचा सन्मान करण्यात आला. यावेळी युवानेते भाऊसाहेब पवार, माजी चेअरमन राहूल पटारे, युवा सेनेचे अक्षय कोकणे, गणेश कोकणे, रामेश्वर आरगडे, मगर विक्रम, माजी सरपंच बंडू पटारे, चेअरमन एकनाथ पटारे, मंदिराचे विश्वस्त लक्ष्मण भालसिंग, गोरख खुरूद, लहानभाऊ पवार, अभिजित लेलकर, राजेंद्र माने, सुरेश गायकवाड तसेच सेवेकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.