देऊळगावराजे, (वार्ताहर)- अंगारकी चतुर्थीनिमित्ताने सिद्धटेक (ता. कर्जत) येथे मोठ्या संख्येने भाविकांनी सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले. श्रींच्या दर्शनासाठी भाविकांनी पहाटेपासून मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.
पिंपरी चिंचवड देवस्थान ट्रस्टमार्फत पहाटे पाचच्या सुमारास दर्शनासाठी सुरूवात करण्यात आली. दर्शनबारीसाठी ट्रस्टमार्फत चांगल्या प्रकारची सोय करण्यात आली होती. भाविकांना पाणी आणि महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
दुपारी अभिषेक करून श्रीच्या मूर्तीस हार, फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली. मंदिर परिसरात विविध विकासकामे सुरू असल्यामुळें वाहनाच्या पार्किगसाठी अडचणी येत होत्या. सकाळपासून मोठ्या प्रमाणात मंदिर परिसरात गर्दी दिसत होती.
व्यावसायिकांची मोठ्या प्रमाणात उलाढाल झाली. यावेळी सिद्धटेक- शिरापूर पुलावर भाविकांनी फोटो काढण्यासाठी गर्दी केली होती. मंदिर परिसरात अनेक सामाजिक संस्थानामार्फत मदत करण्यात आली.