Devendra Fadnavis And Aaditya Thackeray| उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची विधानभवनात लिफ्टमध्ये अचानक भेट झाली होती. यावेळी दोघेही एकाच लिफ्टमधून सभागृहात गेल्याने चांगलीच चर्चा रंगली होती.
यादरम्यान आता विधानभवनात मंगळवारी झालेली देवेंद्र फडणवीस आणि आदित्य ठाकरे यांची भेट झाली. अतिशय हसतखेळत दोघांमध्ये संवाद झाल्याचे यावेळी पाहायला मिळाले. एकमेकांचे कट्टर राजकीय वैरी असलेल्या या नेत्यांची भेट होत असल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
मंगळवारी दुपारी विधानभवनाच्या लॉबीत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमदार आदित्य ठाकरे यांची भेट झाली. यावेळी दोघांमध्ये संवादही झाला.
नेमका दोघांमध्ये काय झाला संवाद ?
आदित्य ठाकरेंना पाहून फडणवीसांनी विचारले की, नमस्कार काय चाललंय? त्यावर आदित्य ठाकरे यांनी म्हटले की, मी लिफ्टमधून चाललोय. आदित्य यांच्या या वाक्यावर देवेंद्र फडणवीस खळाळून हसल्याचे दिसले. आदित्य ठाकरेही त्यावर जोरात हसले. यानंतर दोन्ही नेते आपापल्या दिशेने मार्गस्थ झाले. Devendra Fadnavis And Aaditya Thackeray|
उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची लिफ्टमधील भेट चर्चेत
अधिवेशनाच्या सुरुवातीलाच उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधिमंडळाच्या लिफ्टमध्ये आमने- सामने आले होते. यावेळी शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख तसेच विधान परिषदेतील आमदार उद्धव ठाकरे आणि भाजपा नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांनी विधानभवनातील एकाच लिफ्टने प्रवास केला.
लिफ्टमध्ये त्यांच्याबरोबर प्रवीण दरेकर, छगन भुजबळ आणि मिलिंद नार्वेकरही लिफ्टमध्ये होते. त्यामुळे नेमकी लिफ्टमध्ये या दोन नेत्यांमध्ये कोणती चर्चा झाली यावरून बरीच चर्चा रंगली होती. त्यानंतर उद्धव ठाकरे यांंनी मी आणि देवेंद्रजी यांच्यासोबतचा लिफ्ट प्रवास हा योगायोग असल्याचे म्हंटले होते. Devendra Fadnavis And Aaditya Thackeray|
हेही वाचा:
“सरकारला लाज वाटत नाही का?”; एसटी चालकांच्या पगाराच्या मुद्यावरून बच्चू कडू आक्रमक