नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना जामीन मंजूर करण्यात आला. मद्य धोरणात गैरव्यहार झाल्याच्या आरोपाखाली त्यांना अटक करण्यात आली होती. 1 लाखांच्या जातमुचलक्यावर त्यांना जामीन मंजुर करण्यात आला आहे. जमानतीसंबंधी सर्व औपचारिकता पूर्ण झाल्यानंतर केजरीवाल शुक्रवारी बाहेर येऊ शकतात.
यापूर्वी केजरीवाल यांना लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी जामीन देण्यात आला होता. लोकसभा निवडणुकीचा प्रचार संपताच त्यांची पुन्हा तिहारच्या तुरुंगात रवानगी करण्यात आली होती. आता त्यांना नियमित जामीन मंजूर करण्यात आला आहे. त्यांना जामीन मंजूर झाल्याने आम आदमी पक्षाला मोठा दिलासा मिळाला आहे.