तळेगाव दाभाडे, ( वार्ताहर) – संस्कार, सहकार्य, उत्कर्ष आणि शक्ती या चतु:सूत्रीवर आधारित सरसेनापती उमाबाई दाभाडे सेवा प्रतिष्ठानच्या अध्यक्षपदी दीपक अरुण दाभाडे तर कार्याध्यक्षपदी आनंद सोपानराव दाभाडे पाटील यांची निवड करण्यात आली.
सर सरसेनापती उमाबाई दाभाडे नागरी सहकारी पतसंस्थेच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी प्रतिष्ठानचे संस्थापक संतोष दाभाडे पाटील,माजी नगराध्यक्ष ॲड रवींद्र दाभाडे, सुरेश दाभाडे,
श्रीमंत सरसेनापती सत्यशिलराजे दाभाडे, सर सरसेनापती उमाबाई दाभाडे नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन सुनील दाभाडे, रमेश दाभाडे, दीपक दाभाडे,लक्ष्मण दाभाडे,संपत दाभाडे महेश दाभाडे, राजेंद्र दाभाडे आदी मान्यवर उपस्थित होते.
सेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम यशस्वीरित्या राबविण्यात आल्याची माहिती मावळते अध्यक्ष सुबोध दाभाडे यांनी दिली.
कुठल्याही गोष्टीत सातत्य व सहकार्य यातून संस्था आदर्श होते. असे मत ॲड रवींद्र दाभाडे यांनी व्यक्त केले. प्रतिष्ठानच्या उपक्रमाबाबत संतोष दाभाडे यांनी माहिती दिली. सत्यशील राजे दाभाडे सरकार यांनी शुभेच्छा दिल्या.
नवनिर्वाचित अध्यक्ष दीपक दाभाडे म्हणाले जुन्या पिढीचे विचार आणि नव्या पिढीची प्रगती यांची सांगड घालून आदर्श उपक्रम घेऊन समाजाभिमुख कार्य करायचे आहे. सचिव ॲड विनय दाभाडे यांनी प्रास्ताविक केले तर कार्याध्यक्ष आनंद दाभाडे यांनी आभार मानले.