पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – राज्य सरकारने घोषणा केलेल्या मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण या योजनेची अंमलबजावणी सोमवारपासून (दि.1 जुलै) राज्यात सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी १५ जुलैपर्यंत महिलांना या योजनेसाठी अर्ज करता येणार आहेत, तर दर महिन्यांच्या १५ तारखेला दीड हजार रुपये संबंधित महिलांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे.
हे ठरणार अर्ज करण्यासाठी पात्र
– महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणे आवश्यक
– विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला
– वयाची किमान २१ वर्ष पूर्ण व कमाल ६० वर्षे
-अर्जदाराचे बँक खाते असणे आवश्यक
– कुटुंबांचे एकत्रित वार्षिक उत्पन्न २ लाख ५० हजारांपेक्षा जास्त नसावे
– शासनाच्या अन्य योजनेद्वारे दीड हजार रुपयांपेक्षा जास्त लाभ घेतलेला नसावा
– ट्रॅक्टर वगळून चारचाकी वाहन नावावर नसेल अशा महिला.
आवश्यक कागदपत्रे
-ऑनलाइन अथवा प्रत्यक्ष अर्ज करावा
-आधार कार्ड आवश्यक
– अधिवास प्रमाणपत्र अथवा राज्यातील जन्मदाखला
– बँक पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत
– पासपोर्ट आकाराचा फोटो
– रेशनकार्ड
– योजनेच्या अटी-शर्तींचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र
– अर्ज करताना अर्जदार महिला प्रत्यक्ष उपस्थित राहणे
अर्ज भरण्याची सुविधा
अंगणवाडी केंद्र, बाल विकास प्रकल्प अधिकारी कायालये, ग्रामपंचायत, महापालिकेचे वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्र.