सासवड, (प्रतिनिधी) – संत सोपानकाका सहकारी बँक व श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ, सासवड या संस्थांचे संस्थापक शिक्षणप्रेमी, सहकाररत्न स्व. चंदुकाका जगताप यांच्या 75 व्या जयंतीनिमित्त 5 जिल्हे आणि 57 तालुक्यांत राबविलेल्या संत सोपानकाका स्वच्छ व सुंदर शाळा या उपक्रमाचा बक्षिस वितरण सोहळा मंगळवारी (दि. 11) सकाळी 10 वाजता सासवड येथील आचार्य अत्रे सांस्कृतिक भवनात खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते आणि आमदार संजय जगताप यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार पार पडणार आहे.
सासवड येथे या अभियानाचे प्रमुख तथा आमदार संजय जगताप यांच्या अध्यक्षतेखाली आणि या अभियानाच्या संयोजकांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद पार पडली. यामध्ये वरील देण्यात आली.
याप्रसंगी प्रदीप पोमण, संत सोपानकाका फाउंडेशनचे प्रकाश पवार, पुरंदर नागरीचे सरव्यवस्थापक अनिल उरवणे, सतीश शिंदे, शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे रविंद्रपंत जगताप, समन्वय समितीचे सदस्य कुंडलिक मेमाणे, प्राचार्य नंदकुमार सागर, वसंतराव ताकवले, सुधाकर जगदाळे, रामप्रभू पेटकर, दत्तात्रय रोकडे उपस्थित होते.
याप्रसंगी उपक्रमशील शाळा पुरस्काराने विभागातून 5 शाळांचा विशेष सन्मान होणार आहे. तसेच जिल्हा स्तरावर, तालुकास्तरावर प्रत्येकी प्रथम तीन क्रमांक काढण्यात आले आहेत.
या कार्यक्रमाप्रसंगी पुरंदर आणि हवेली तालुक्यातील तालुकास्तरावरील विजेत्या शाळांचाही सन्मान करण्यात येणार असल्याची माहिती समन्वयक कुंडलिक मेमाणे यांनी दिली. तसेच पाचही जिल्ह्यातील तालुकानिहाय पारितोषिक वितरण समारंभ त्या त्या तालुक्याच्या ठिकाणी होणार आहे. या अभियानात एकूण 3 हजार शाळांनी सहभाग घेतला आहे.
जिल्ह्यातील प्रथम तीन विद्यालये
शारदाबाई पवार विद्यानिकेतन (शारदानगर, बारामती), गुरूवर्य रा. प. सबनीस विद्यामंदिर (नारायणगाव, ता. जुन्नर), लक्ष्मणराव आपटे प्रशाला (डेक्कन पुणे). उपक्रमशील शाळा : ज्ञानदा प्रशाला किरकटवाडी (ता. हवेली).