children die । क्रिकेट खेळताना बॉल कधी कुठे जाईल याचा नेम नसतो. असाच पत्र्यावर पडलेला बॉल काढायला जण एका चिमुरड्याच्या जीवावर बेतले आहे. मुंबईतील या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. पत्र्यावर पडलेला बॉल काढण्यासाठी गेलेल्या 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडलीय. गोरेगावमध्ये ही धक्कादायक घटना घडलीय.
बॉल काढणं जीवावर बेतलं children die ।
गोरेगाव पूर्वेकडील मीनाताई ठाकरे मैदानात रविवारची सुट्टी असल्याने दुपारी 3 च्या सुमारास क्रिकेट खेळण्यासाठी गेलेल्या दहा वर्षाच्या चिमुकल्याचा बॉल म्हाडाकडून पोलिसांसाठी बांधलेल्या चौकीच्या छतावर पडला. तो बॉल काढण्यासाठी गेलेल्या मुलाचा विजेचा जोरात शॉक लागल्याची घटना घडली
विजेचा शॉक लागून चिमुरड्याचा दुर्दैवी मृत्यू children die ।
दरम्यान, चिमुकला बॉल काढण्यासाठी पत्र्यावर चढला असता त्याला विजेचा शॉक लागून जागीच दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेने मीनाताई ठाकरे मैदानातील लहान मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
या घटनेची माहिती मिळताच दिंडोशी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मयत मुलाचा मृतदेह पंचनामा करून शवविच्छेदनासाठी ट्रामा केअर रुग्णालयात पाठवला असून या प्रकरणी नेमकी चूक कोणाची आहे, याचा तपास दिंडोशी पोलीस करीत आहेत.