Chief Minister Eknath Shinde । पुण्यातील हॉटेल्समध्ये ड्रग्जची विक्री केली जात असल्याचं समोर आल. याचे राज्यभर पडसाद उमटले. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या आदेशानंतर कारवाई करण्यात आली. पुण्यातील पब आणि बारवर कारवाई केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशावरून ठाणे आणि मीरा भाईंदरमधील देखील अनधिकृत बार आणि पबवर कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानंतर ठाणे पोलीस आणि ठाणे महानगरपालिकेकडून अनधिकृत बार आणि पब वर कारवाई करण्यात आली.
या कारवाईत ठाण्यातील मोठ्या अनधिकृत पब आणि बारवर बुलडोझर चालविण्यात आले. अशात आता या कारवाईनंतर ठाण्यात ठिकठिकाणी एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ पोस्टरबाजी करण्यात आली आहे. हे पोस्टर चांगलेच चर्चेत ते आहे.
या पोस्टरद्वारे शिंदे यांच्या कामाचे कौतुक करण्यात आले आहे. या पोस्टरवर ‘महाराष्ट्राचा बुलडोझर बाबा’ असा मजकूर लिहिण्यात आला आहे. हे पोस्टर आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कामाचं कौतुक करणारे पोस्टर लावले आहेत.
‘ड्रग माफियांचा कर्दनकाळ, महाराष्ट्राचा बुलडोजर बाबा’ असं या पोस्टरवर म्हणण्यात आलं आहे. जनता आपल्या सोबत अशीच कारवाई करत राहा, अशा आशयाचे बॅनर ठाण्यात लावण्यात आले आहेत. त्यामुळे ठाण्यातील हे पोस्टर राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनले आहेत.