मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी महत्वाची घोषणा केली आहे. राज्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी चारधाम यात्रेसाठी ‘मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना’ सुरु करणार असल्याचे वक्तव्य शिंदे यांनी दिली.
मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेची मागणी शिवसेना शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांनी केली होती प्रताप सरनाईक यांनी अनेकदा तिर्थदर्शन योजनेचा मुद्दा उपस्थित केला होता. याच योजनेबाबत बोलताना शिंदे म्हणाले की,’महाराष्ट्र संताची भुमी आहे. पांडुरंगाची वारी सुरु आहे. आपण पहिल्यांदाच 20 हजार रुपये दिंडीला अनुदान देण्याचा निर्णय घेतल्याचे मुख्यमंत्री म्हणाले
एकनाथ शिंदे यांनी या योजेनबाबत पुढे सांगताना म्हणाले,’नियम ठरवले जातील. दरवर्षी नियमावली करुन आपण किती लोकांना पाठवू शकतो हे ठरवू. बाय रोटेशनप्रमाणे ही योजना सुलभपणे राबवू असे मुख्यमंत्री म्हणाले. काही जणांची इच्छा असते पण ते लोक जाऊ शकत नाहीत. अशा ज्येष्ठांना नागरिकांनासाठी ही योजना लागू करु असे मुख्यमंत्री म्हणाले.
या योजनेचा आशिर्वाद सरकारला मिळेल. आम्ही नवीन नवीन निर्णय घेऊ, असे मुख्यमंत्री म्हणाले. लाडकी बहिण योजना आपण सुरु केली आहे. तर काही लोक म्हणाले की आरे लाडका भाऊ कुठे गेला. तर आम्ही लाडक्या भावाचा देखील निर्णय घेतल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले.