Chhagan Bhujbal on Manoj Jarange । मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यात पुन्हा एकदा जोर धरू लागला आहे. त्यातच मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासह आता मुस्लिमांच्या आरक्षणाची मागणी केली होती. तेपण ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याची मागणी त्यांनी केली होती. पण त्यांच्या याच मागणीवरून आता राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी जरांगेंना डिवचले असल्याचे दिसत आहे.
नाशिक येथे पत्रकारांशी संवाद साधताना भुजबळ यांनी,” मनोज जरांगेंचा अभ्यास कमी आहे. त्यांनी आधी अभ्यास करावा. मुस्लिम समाजाला 25 वर्षांपूर्वीच ओबीसीतून आरक्षण दिले आहे,” असे म्हणत मनोज जरांगेंवर टीका केलीय. राज्यात काही ठिकाणी मुस्लीम समाजाच्याही कुणबी म्हणून नोंदी सापडल्या आहेत. त्यामुळे आता मुस्लिमांनाही ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्यावे, अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली होती. यावरून मंत्री छगन भुजबळ यांनी मनोज जरांगेंवर निशाणा साधलाय.
कधी मुस्लिमांना तर कधी धनगरांना खुश करण्यासाठी मागण्या Chhagan Bhujbal on Manoj Jarange ।
छगन भुजबळ यांनी पुढे, “मुस्लिम समाजाला आरक्षण मिळावे, अशी मागणी कोण करताय, जरांगे करताय, त्यांचा अभ्यास कमी आहे. त्यांना म्हणावं आधी अभ्यास करा. मुस्लिम समाजाला 25 वर्षापूर्वीच ओबीसीतून आरक्षण दिले आहे. कधी मुस्लिमांना तर कधी धनगर समाजाला खुश करण्यासाठी ते मागण्या करत असल्याची टीका त्यांनी केली आहे.
अजून दमडीही मिळाली नाही Chhagan Bhujbal on Manoj Jarange ।
महायुतीच्या आमदारांना भरघोस निधी मिळणार असल्याची चर्चा आहे. यावर छगन भुजबळ म्हणाले की, निधी वाटपचे दान काय अजून दमडी मिळाली नाही. लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितामुळे सर्व कामे राज्यभरात बंद आहेत. शिक्षक निवडणुकीमुळे पुन्हा आचारसंहिता सुरू आहे. म्हणून कामे रखडली आहेत, असे त्यांनी म्हटले आहे.