सातारा, (प्रतिनिधी) – वडूथ, ता. सातारा येथे नागरिकांच्या आरोग्यासाठी काळजी घेण्यासाठी सुविधांनी सुसज्ज असलेले प्राथमिक आरोग्य बनले आहे. मात्र, येथे एसटी थांबा नसल्याने रुग्णांची गैरसोय होत होती.
अखेर सततच्या पाठपुराव्यामुळे सातारा एसटी महामंडळकडून वडूथ-सातारारोड मार्गावरील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये जाण्यासाठी नवीन बस थांबा मंजुर झाल्याचे माहिती भाजप युवा मोर्चाचे जिल्हा सचिव मदन साबळे यांनी दिली.
याबाबत सविस्तर वृत्त असे विभागातील नागरिकांच्या आरोग्यासाठी वडूथमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. परंतु हे गावापासून दूर असल्यामुळे त्याठिकाणी नागरिकांना जाण्यासाठी गैरसोई होत होती. त्यावेळी एसटी हाच एकमेव होता परंतु याठिकाणी एसटीचा थांबा नव्हता ही गरज ओळखून भाजप युवा मोर्चाचे जिल्हा सचिव मदन साबळे यांनी निवेदन दिले होते. त्याचबरोबर सातत्याने पाठपुरावा केला.
त्यामुळे गुरुवारी दि.२० जून पासून प्राथमिक आरोग्य केंद्र, वडूथ हा एसटी गाड्यांसाठी संगणक प्रणालीवर थांबा घेऊन तशा चालक वाहकांना आदेश आणि सुचना परिवहन विभागाने दिल्या आहेत. याबद्दल मदन साबळे यांनी परिवहन विभागाचे आभार मानले.