मुंबई – बॉलीवूड अभिनेता कार्तिक आर्यन हा एकापाठोपाठ एक चित्रपटांची घोषणा करत आहे. काही दिवसांपूर्वी त्याने रोहित धवन दिग्दर्शित “शहजादा’या चित्रपटाची घोषणा केली होती. तेव्हा पासूनच फॅन्स या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत होते. अखेर हा चित्रपट मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला आहे. “शहजादा’ चित्रपटात कार्तिक आर्यन सोबत अभिनेत्री क्रिती सेनन मुख्य भूमिकेत झळकणार आहे. हा चित्रपट साऊथ अभिनेता अल्लू अर्जुनच्या ‘अला वैकुंठपुरमुलु’ या चित्रपटाचा हिंदी व्हर्जन असणार आहे.
दरम्यान, कार्तिकच्या आधीच्या चित्रपटाच्या मानाने त्याचा हा चित्रपट प्रेक्षकांना चित्रपटगृहाकडे खेचून आणण्यात अपयशी ठरला असल्याचं दिसून आलं आहे. प्रदर्शनानंतरच्या दुसऱ्याच दिवशी या चित्रपटाने भारतात 7 ते 9 कोटीच्या आसपास कमाई केली आहे. दरम्यान, नुकतंच अभिनेत्याला मुंबई पोलिसांनी दंड ठोठावला असल्याचं पाहायला मिळालं आहे.
Problem? Problem yeh thi ki the car was parked on the wrong side!
Don’t do the ‘Bhool’ of thinking that ‘Shehzadaas’ can flout traffic rules. #RulesAajKalAndForever pic.twitter.com/zrokch9rHl— Mumbai Traffic Police (@MTPHereToHelp) February 18, 2023
झालं असं की, दोन दिवसांपूर्वी अभिनेता कार्तिक आर्यन आपल्या आई-वडिलांना भेटण्यासाठी घरी गेला होता. यावेळी त्याची लक्झरी कार एका नो पार्किंग झोनमध्ये उभी होती. आणि त्याच्या या आलिशान गाडीवर आता मुंबई पोलिसांनी कारवाई केली असून, दंड देखील ठोठावला आहे. मुंबई पोलिसांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून याबद्दल माहिती दिली आहे.
मुंबई वाहतूक पोलिसांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर कार्तिकच्या लॅम्बोर्गिनी कारचा फोटो शेअर केला असून, एक मजेशीर कॅप्शन देखील आहे. ‘समस्या? समस्या ये थी की कार चुकीच्या बाजूला उभी होती! ‘शहजादा’ वाहतूक नियमांची पायमल्ली करू शकतो, या विचाराची ‘भूल’ करू नका, असे त्यात म्हटले आहे. वाहतूक पोलिसांनी अभिनेत्याच्या वाहनाची नंबर प्लेट अस्पष्ट केली आहे.