Bollywood News । एक प्रेम जे खूप प्रयत्न करूनही पूर्ण होऊ शकले नाही. 2018 मध्ये आलेल्या ‘धडक’ चित्रपटात जान्हवी कपूर आणि ईशान खट्टरची अपूर्ण प्रेमकहाणी पाहायला मिळाली. आता 5 वर्षांनंतर त्याचा सिक्वेल जाहीर झाला आहे. करण जोहरने ‘धडक 2’ची घोषणा केली आहे. ‘धडक 2’ त्याच्या निर्मिती अंतर्गत तयार केले जाणार आहे. शाझिया इक्बाल या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे.
View this post on Instagram
यावेळी चाहत्यांना सिद्धार्थ चतुर्वेदी आणि तृप्ती डिमरी यांची जोडी रुपेरी पडद्यावर पाहायला मिळणार आहे. नीलेश आणि विदिशाच्या प्रेमकथेची चाहत्यांना ओळख होणार आहे. घोषणा व्हिडिओमधून दोन्ही स्टार्सचा फर्स्ट लूकही समोर आला आहे. करण जोहरने घोषणा करतांना लिहिले आहे की ही कथा थोडी वेगळी आहे कारण,’ एक था राजा-एक थी रानी, जात अलग थी ख़त्म कहानी…’
करणच्या कॅप्शनवरून हे स्पष्ट होते की, चित्रपटात जातीचा अँगल दाखवण्यात आला आहे. नीलेश आणि विदिशाची प्रेमकहाणी त्यांच्या वेगवेगळ्या जातींमुळे पूर्ण होणार नाही. कारण दोघांची दुनिया वेगळी आहे. हा चित्रपट 22 नोव्हेंबरला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.
‘ॲनिमल’च्या सुपर यशानंतर तृप्तीकडे चित्रपटांची रांग लागली आहे. यामध्ये बॅड न्यूज, विकी विद्याचा व्हिडिओ, भूल भुलैया 3 यांचा समावेश आहे. सिध्दांतकडे धडक 2 पाइपलाइनमध्ये आहे. तो अखेरचा ‘खो गये हम कहाँ’ या चित्रपटात दिसला होता.
हे वाचाल का ? साऊथचा सुपरस्टार रवी तेजा – श्रीलीला करणार ‘स्क्रीन शेअर’