Ashadhi Wari 2024 – विविध भक्तनिवासमध्ये राहण्यासाठी भाविकांचा ओढा असतो. या विविध भक्तनिवासांमध्ये असलेल्या 364 रुममध्ये जवळपास रोज 1500 भाविकांच्या निवासाची सोय होऊ शकते.
यामध्ये भाविकांना चहा, नाश्ता, भोजन मिळावे यासाठी या हॉटेलचा ठेका देण्यात आला होता. मात्र, जास्त दर लावून भाविकांची लूट होत असल्याच्या तक्रारी समोर येत होत्या.
शनिवारपासून मंदिर समितीने हे हॉटेल ताब्यात घेतले आहे. मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके व व्यवस्थापक बालाजी पुदलवाड सर्व सुविधांकडे लक्ष ठेवून आहेत. मंदिर समितीने चहा, कॉफी, दूध आणि नाश्त्याच्या दरात निम्म्याने कपात केली आहे.
तर जेवणाची थाळी केवळ 100 रुपयात ठेवल्याने भाविकांना मोठा दिलासा मिळणार आहे. दरम्यान, या भक्तनिवासमध्ये वर्षभरात देशभरातून तीन लाखापेक्षा जास्त भाविक निवासासाठी येत असतात.