Canopy collapses at Rajkot Airport| गुजरातमध्ये मुसळधार पावसामुळे राजकोट विमानतळावर आज दुपारी एक मोठी दुर्घटना घडली आहे. विमानतळ टर्मिनलच्या बाहेर पॅसेंजर पिकअप आणि ड्रॉप एरियामध्ये छत कोसळले आहे. नुकतेच शुक्रवारी मुसळधार पावसामुळे दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर छताचा काही भाग कोसळून कॅब चालकाचा मृत्यू झाला.
या अपघातानंतर गुजरातमध्येही अशीच घटना घडल्याचे समोर आले आहे. तसेच नव्याने बांधण्यात आलेल्या डुमना विमानतळाची वरची बाल्कनीही अचानक कोसळली होती. यावेळी तेथे उभ्या असलेल्या अधिकाऱ्याच्या गाडीचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नाही. अन्यथा मोठी दुर्घटना घडू शकली असती. यानंतर आता राजकोट विमानतळावरील ही तिसरी घटना समोर आली आहे. सुदैवाने अपघातावेळी याठिकाणी कोणी उपस्थित नसल्याने मोठी दुर्घटना टळली.
तीन महिन्यांपूर्वी मोदींच्या हस्ते उद्घाटन
तर दुसरीकडे, 10 मार्च 2024 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 450 कोटी रुपये खर्चून बांधलेल्या जबलपूरमधील डुमना विमानतळ आणि ग्वाल्हेर विमानतळाचे उद्घाटन केले होते. अवघ्या तीन महिन्यांनंतर विमानतळाची छत तुटल्याने बांधकामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
नेमकं काय घडलं होतं?
आयकर विभागातील वाहन क्रमांक MP-20 ZC-5496 ची गाडी सहायक आयुक्तांना डुमना विमानतळावर सोडण्यासाठी गेले होती. चालकाने गो अँड ड्रॉप परिसरात कार पार्क केली होती. अधिकाऱ्याला सोडण्यासाठी सर्वजण विमानतळाच्या आत गेले होते. त्यावेळी सकाळी 11.30 वाजता कारवर फॅब्रिकचे शेड पडले, त्यामुळे कारचे नुकसान झाले आहे.
दरम्यान, शुक्रवारी दिल्ली विमानतळावर छताचा काही भाग कोसळून एका व्यक्तीचा मृत्यू आणि किमान सहा जण जखमी झाल्यानंतर नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने देशातील सर्व विमानतळांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे आदेश दिले आहेत. येत्या दोन ते पाच दिवसांत तपासणी पूर्ण करून अहवाल मंत्रालयात सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शुक्रवारी पहाटे 5 वाजताच्या सुमारास टर्मिनल-1 येथे घडलेल्या या घटनेनंतर टर्मिनलवरील कामकाज स्थगित करण्यात आले होते.
हेही वाचा: