Joe Biden । Donald Trump – अमेरिकेत अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठीची प्रक्रिया सुरू झाली असून विद्यमान अध्यक्ष ज्यो बायडेन आणि माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर डिबेटमध्ये विविध मुद्द्यांवरून परस्परांवर हल्लाबोल केला. त्यामुळे निवडणुकीचे वातावरण तापण्यास सुरूवात झाली आहे.
बायडेन डेमोक्रॅटीक पक्षाकडून तर ट्रम्प रिपब्लिकन पक्षाकडून रिंगणात आहेत. त्यांच्यात झालेल्या डिबेटमध्ये अमेरिकेची अर्थव्यवस्था, इस्त्रायल हमास संघर्ष, जागतिक हवामान बदल, युक्रेन, अफगाणिस्तान आदींसह विविध मुद्द्यांवर चकमक रंगली.
युक्रेन- रशिया युध्द रोखण्यासाठी बायडेन यांनी काहीच केली नाही आणि खरे पाहायला गेले तर युध्दाला प्रोत्साहन देण्याचेच काम त्यांनी केले असा आरोप ट्रम्प यांनी केला.
ट्रम्प यांच्या आरोपांना उत्तर देताना बायडेन म्हणाले की रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमिर पुतीन युध्द गुन्हेगार आहेत. रशियाचे सोविएत साम्राज्य बनवण्याची त्यांची इच्छा आहे. मात्र प्रत्यक्षात तसे होणार नाही.
ट्रम्प यांनी असा दावा केला की ते जर अमेरिकेचे अध्यक्ष असते तर त्यांनी युक्रेन- रशिया युध्दच होऊ दिले नसते. इस्त्रायलच्या समर्थनार्थ पैसा उभारण्यावरही त्यांनी प्रश्न उपस्थित केले.
डिबेटमध्ये बायडेन यांनी पॅरिसमध्ये झालेल्या शांतता कराराची प्रशंसा केली. तर ट्रम्प यांनी त्यांच्या कार्यकाळातील गोष्टींचा दाखल देत दावा केला की त्यांच्या कार्यकाळात पर्यावरणाची स्थिती खूप चांगली होती.
पॅरिस शांतता करारासाठी अमेरिकेला एक दशलक्ष डॉलर एवढा खर्च करावा लागला. मात्र भारतासारख्या देशांना त्यासाठी काहीच खर्च करावा लागला नाही.