पुसेगाव, (प्रतिनिधी)- येथील श्री सेवागिरी शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेच्या पुसेगाव येथील इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालयाच्या इमारतीचा भूमिपूजन समारंभ शनिवारा दि. २९ रोजी श्री सेवागिरी मठाचे मठाधिपती १०८ पपू श्रीमहंत सुंदरगिरी महाराज यांच्या हस्ते होणार आहे.
या विद्यालयास शासनाची मुलामुलींच्या सहशिक्षणास नुकतीच परवानगी मिळाली आहे. आठवी ते दहावीपर्यंतच्या मुलामुलींना उच्च प्रतीचे शिक्षण मिळावे, त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी या विद्यालयाच्या नूतन इमारतीचा संकल्प केला आहे.
या भूमीपूजन सोहळ्यास उपस्थित राहवे, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, उपाध्यक्ष बाळासाहेब जाधव, सचिव मोहनराव जाधव तसेच पदाधिकाऱ्यांनी केले आहे.