सातारा, (प्रतिनिधी)- येथील श्री उत्तर चिदंबरम नटराज मंदिरात आयोजित करण्यात आलेल्या 21व्या भजन मेळाव्यामध्ये उद्या दि. ३० रोजी श्री राधाकृष्ण कल्याणम (लग्न सोहळा) व पपू शंकराचार्य, श्री श्री श्री महास्वामी चंद्रशेखरेंद्र सरस्वती स्वामीजींच्या पादुकांना लक्ष पुष्पार्चना कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाने मेळाव्याची सांगता होणार आहे.
सर्व भक्तांनी या भजन मेळाव्यास उपस्थित राहून श्री शिवकामसुंदरी व आनंद नटराज आणि पपू शंकराचार्यांचे आशीर्वाद घ्यावेत, असे आवाहन संयोजकांनी केले आहे. दरम्यान, काल शुक्रवारी मेळाव्यात मान्यवरांचा शाल ,श्रीफळ तसेच नटराजाची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला.
तीनशेहून अधिक सुवासिनी महिलांना साड्यांचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रमुख संयोजक गोपी भागवत यांनी या महोत्सवांतर्गत सुरू असलेल्या कार्यक्रमाची माहिती दिली. श्रीमद शंकराचार्य चंद्रशेखरेंद्र सरस्वती,
जयेंद्र् सरस्वती यांच्या आशीर्वादाने व सध्याचे कांचीपीठाचे प्रमुख शंकराचार्य श्रीमद स्वामी विजयेंद्र सरस्वती महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली हा भजन मेळावा आयोजित करण्यात आला.
शाल व साडी वितरण कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून हेमंतराव हरहरे, मुकुंदराव आफळे, सुभाष दर्भे, ॲड. नितीन शिंगटे, महेश शिवदे, जयंत देशपांडे, आशिष शहाणे यांच्यासह इस्कॉनचे प्रवीण रसाळ, विजयराव गाढवे,
अमेरिकेतून आलेले शंकर नारायणन, विश्व हिंदू परिषदेचे मान्यवर उपस्थित होते. वेदमूर्ती जगदीशशास्त्री भट, मंदिराचे व्यवस्थापक चंद्रशेखरन नारायणराव आदींच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम झाला .