चिंबळी, (वार्ताहर) – कुरुळी (ता. खेड) येथील भैरवनाथ माध्यमिक विद्यालयाचे आदर्श मुख्याध्यापक राजबा यशवंत पवार 32 वर्षांच्या प्रदिर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झाले. सेवानिवृत्ती निमित्त त्यांचा विद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी भैरवनाथ चॅरीटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष एम. के. सोनवणे, संस्थेचे अध्यक्ष शांताराम सोनवणे, सचिव देवराम सोनवणे, खजिनदार बाळासाहेब कड, कार्याध्यक्ष गुलाब सोनवणे, विद्यालयाचे नवनिर्वाचित मुख्याध्यापक रावसाहेब व्यवहारे, सहशिक्षक भाऊसाहेब थोरात, निवृत्ती भुजाडे, सतीश नायकवाडी, संदीप सासवडे, राजकुमार गायकवाड, संतोष भोसले, बाळासाहेब मुळे,
सहशिक्षिका कांता मोरे, शिक्षकेत्तर कर्मचारी प्रदीप लोखंडे, हिरामण ढेंगळे, विद्यार्थी प्रतिनिधी सत्यवान वाडेकर, सचिन वाडेकर, सरपंच अनिता बधाले, उपसरपंच दीपक डोंगरे, माजी उपसरपंच नितीन कड यांनी पवार यांना सेवानिवृत्तीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.
पवार हे खास विज्ञान विषयाचे शिक्षक होते. त्याचे विषयाचा दहावीचा निकाल 100 टक्के असायचा. राजबा पवार यानां दोन पुरस्कार मिळाले होते. एक आर्दश शिक्षक व दुसरा आर्दश मुख्याध्याक मिळाला. त्यांच्या कारकिर्दीत विद्यालयाचा मार्च 2024 एस.एस.सी. परीक्षेचा निकाल 100 टक्के लागला आहे.