Atishi Health Update| दिल्लीच्या मंत्री आणि आपच्या नेत्या आतिशी यांची प्रकृती खालावल्याने त्यांना एलएनजेपी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आतिशी यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे. समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी बुधवारी एलएनजेपी रुग्णालयात पोहोचून आतिशी यांची भेट घेतली आणि त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.
यानंतर अखिलेश यादव म्हणाले, “मी आज आतिशी यांच्या प्रकृतीची माहिती घेण्यासाठी आलो आहे. आतिशी नेहमीच दिल्लीच्या लोकांसाठी लढत राहिल्या आहे. मी मुख्यमंत्री राहिलो असल्याने मला समस्या माहित आहेत. केंद्रात भाजपचे सरकार आल्यापासून मुख्यमंत्र्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अरविंद केजरीवाल यांना जनतेसाठी काम करायचे आहे. परंतु भाजपचे लोक सीबीआईचा चुकीचा वापर करत आहे.”
मैं यहां जल मंत्री @AtishiAAP जी की स्वास्थ्य की जानकारी लेने आया था।आतिशी जी बहादुर हैं और लड़ना जानती हैं। वह दिल्ली की जनता के लिए लड़ती रही हैं।
जब से केंद्र में BJP की सरकार बनी है, मुख्यमंत्री केजरीवाल जी की सरकार को अपेक्षित सहायता नहीं दे रही है।
उन्होंने… pic.twitter.com/uztW5H5uua
— AAP (@AamAadmiParty) June 26, 2024
या भेटीबाबत आपने एक्स अकाऊंटवर माहिती देत सांगितले की, “समाजवादी पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांनी दिल्लीकरांच्या हक्काचे पाणी मिळवून देण्यासाठी आपले जीवाची बाजी लावणाऱ्या जल मंत्री आतिशी यांच्या तब्येतेची विचारपुस करण्यासाठी आले होते. यावेळी आपचे खासदार संजय सिंह आणि आमदार दिलीप पांडेजीही उपस्थित होते.’
आतिशी यांच्या बेमुदत उपोषणाला पूर्णविराम
दरम्यान, आपच्या नेत्या आतिशी यांना मंगळवारी पहाटे प्रकृती खालावल्याने रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्यामुळे त्यांच्या बेमुदत उपोषणाला पूर्णविराम मिळाला. मात्र आता आपने दिल्लीतील पाणीबाणीचा मुद्दा संसदेत उपस्थित करण्याचा निर्णय घेतला आहे.
देशाची राजधानी दिल्लीला मागील काही दिवसांपासून तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. त्या पाणीबाणीवरून त्यांनी शुक्रवारपासून उपोषण सुरू केले. हरियाणातून अधिक पाणी उपलब्ध होण्याच्या मागणीसाठी त्यांनी ते पाऊल उचलले. उपोषणाच्या चौथ्या दिवशी त्यांची प्रकृती खालावली. त्यामुळे त्यांना लोकनायक रूग्णालयाच्या अति दक्षता विभागात (आयसीयू) दाखल करण्यात आले. उपचारानंतर त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले.
हेही वाचा: