Madhya Pradesh । मध्य प्रदेशचे सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्री नारायण सिंह कुशवाह यांनी अजब सल्ला दिला आहे. भोपाळमध्ये अंमली पदार्थ विरोधी जनजागृतीवर आयोजित कार्यक्रमादरम्यान कुशवाह यांनी दिलेल्या सल्ला सध्या चांगलाच चर्चेत आहे. महिलांनी आपल्या पतींना बाहेर न जाता घरी दारू पिण्यास सांगावे. मुलांसमोर असे केल्यास त्यांना लाज वाटेल आणि ते हळूहळू स्वतःहून दारू पिणे बंद करतील. असे ते म्हणाले आहे.
‘माझ्या पतीने दारू पिऊ नये, असे माता-भगिनींना वाटत असेल, तर आधी त्यांना सांगा की त्याने बाहेर दारू पिऊ नये, त्याने ती घरी आणून माझ्यासमोर प्यावी. जर तुम्ही समोर प्यायले तर त्यांची मर्यादा कमी होईल आणि हळूहळू बंद होण्याच्या मार्गावर येईल. मी माझ्या बायको आणि मुलांसमोर दारू पितोय याची त्याला लाज वाटेल. तसेच त्याला सांगा की, तुम्हाला पाहून मुलेही दारू पितील. हळूहळू त्याचे मद्यपान बंद होईल, हे पूर्णपणे व्यावहारिक आहे. महिलांनो तुमचा नवरा दारू सोडेल.’ असेही ते म्हणाले आहे.
मंत्री नारायण सिंह कुशवाह पुढे म्हणाले,’महिलांनी दारू पिणाऱ्या पतींना सिलिंडर दाखवावे. जे लोक दारू पिऊन घरी येतात त्यांच्यासाठी अन्न शिजवू नका तुमची स्वतःची बेलन गँग तयार करा. तुमचा समुदाय तयार करा. सामाजिक मूल्यांमुळे अनेकांना हे जमत नाही, पण चुकीचे काम थांबवताना मूल्ये आड येऊ नयेत. कुशवाह यांनीही दारूबंदीवर आपले मत मांडले. ते म्हणाले की, ज्या राज्यांमध्ये दारू बंदी लागू आहे तेथेही ते उपलब्ध आहे. बिहार आणि गुजरातमध्ये दारूवर बंदी आहे, पण तिथेही छुप्या पद्धतीने दारू विकली जाते. जनजागृती हाच दारूबंदीवर उपाय आहे.; सध्या त्यांच्या या सल्ल्याची सर्वत्र चर्चा होत आहे.