Anushka Sharma Post | भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात शनिवारी टी-20 विश्वचषक 2024 चा विजेतेपदाचा सामना खेळला गेला. या स्पर्धेच्या फायनल सामन्यात दक्षिण आफ्रिकेला 7 धावांनी पराभूत करत भारताने दुसऱ्यांदा विश्वचषकावर आपलं नाव कोरलं. या विजयाचा देशभरात मोठा जल्लोष करण्यात आला. बॉलिवूड अभिनेत्री आणि विराटची पत्नी अनुष्का शर्मा हिनेही पोस्ट शेअर करत टीम इंडियाचं कौतुक केलं. त्यानंतर तिने विराटसाठी एक भावूक पोस्ट शेअर केली आहे.
विजयानंतर भारतीय संघातील खेळाडूंना टीव्हीवर रडताना पाहून अनुष्काची लेक माहिकालाही एका गोष्टीची काळजी वाटली. ही गोष्ट अनुष्काने पोस्टमधून सांगितले आहे. मॅच जिंकल्यानंतर खेळाडूंचे विविध फोटो अनुष्काने या पोस्टमध्ये शेअर केले आहेत.
“आजचा टी- २० विश्वचषक सामना संपल्यानंतर माहिकाने टीव्हीवर टीम इंडियाला रडताना पाहिलं. त्यांना तिथे धीर देण्यासाठी कोण असेल ?” असा प्रश्न मला विचारला. “हो डार्लिंग… कारण १.५ बिलियन प्रेक्षकांनी आपल्या खेळाडूंना मिठी मारली आहे,” असं मी तिला म्हणाले. टीम इंडियाने आजच्या मॅचमध्ये जबरदस्त कामगिरी केलेली आहे. चॅम्पियन्स… अभिनंदन !” अशी पोस्ट अनुष्काने इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे.
View this post on Instagram
तर दुसरी पोस्टअनुष्काने खास विराटसाठी शेअर केलेली आहे. भारताच्या या विजयानंतर सामनावीर पुरस्कार घेताना विराटने जाहीर टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील हा त्याचा अंतिम सामना असल्याचे जाहीर केले. यानंतर अनुष्काने विराटसाठी पोस्ट शेअर करत लिहिले की, “मी या व्यक्तीवर जीवापाड प्रेम करते. विराट कोहली तु माझा आहेस, हे सांगताना मला खूप आनंद होतो. जल्लोष साजरा करण्यासाठी येताना माझ्यासाठी स्पार्कलिंग वॉटर घेऊन ये” असे कॅप्शन तिने दिली आहे. पोस्टमध्ये विराट कोहलीच्या हातात ट्रॉफी उंचावताना दिसत आहे.
हेही वाचा:
लष्कराच्या इतिहासात अजब योगायोग ; दोन वर्गमित्र…एक नौदलाचा तर दुसरा बनला लष्कराचा प्रमुख