Kedar Shinde Post| दिग्दर्शक आणि अभिनेता केदार शिंदेचा ‘बाई पण भारी देवा’ हा चित्रपट सुपरहिट ठरला. या चित्रपटाला रसिक प्रेक्षकांचे खूप प्रेम मिळाले. या चित्रपटातील कलाकारांचे देखील सर्व स्तरातून कौतुक करण्यात आले.
या चित्रपटात अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, दीपा परब, सुकन्या कुलकर्णी, सुचित्रा बांदेकर, शिल्पा नवलकर या सहा अभिनेत्रींनी साकारलेल्या भूमिकेने प्रेक्षकांच्या मनात घर निर्माण केलं. चित्रपटगृहानंतर हा चित्रपट ओटीटीवर रिलीज झाला आहे. तेथेही चित्रपटाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. या सुपरहिट चित्रपटाला नुकतेच एक वर्ष पूर्ण झाले आहे. त्यानिमित्ताने दिग्दर्शक केदार शिंदेंनी खास पोस्ट लिहिली आहे.
View this post on Instagram
केदार शिंदे यांनी ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटाचा पोस्टर शेअर करत लिहिले की, “याच दिवशी…मागच्या वर्षी…एक आयुष्यात घटना घडली. प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते. माझ्या पाठीशी ६ दणदणीत ब्लॉकबस्टर बायका होत्या. ‘बाईपण भारी देवा’ या सिनेमाने मला खूप काही दिलं. द्रव्य रूपात नाही. पण महाराष्ट्रातील तमाम स्त्रीयांच्या मनात एक महत्त्वाची जागा नक्कीच मिळाली. आज वर्ष झालं तरी कौतुकाचा वर्षाव कमी झाला नाही. सैराट’नंतरचा गल्ला या सिनेमाने कमावला.
“मी नेहमीच म्हणतो, एक बाई जर घर चालवते, तर ती नक्कीच सिनेमा चालवू शकते. जबाबदारीची जाणीव आहे. यानंतर जे जे करेन ते ते या सिनेमाच्या तुलनेत प्रेक्षक पाहणार. धुंदीत राहून काम करणार नाही. पुन्हा शुन्यापासून सुरुवात केली आहे. मला खात्री आहे मायबाप प्रेक्षक पुन्हा पाठीशी उभे राहतील. स्वामींसारखेच!”, असं केदार शिंदेंनी लिहिलं आहे. या पोस्टनंतर नेटकऱ्यांकडून देखील शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
हेही वाचा:
“आपलं एकच लक्ष्य आगमी विधानसभा निवडणूक” ; शरद पवार यांनी दिली कबुली