अभिनेत्री श्रद्धा कपूरने नुकतेच असे काही केले ज्यामुळे तिची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा होत आहे. श्रद्धाचा एक नवीन व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये अभिनेत्री एका कार्यक्रमात फोनची जाहिरात करताना दिसत आहे. विशेष म्हणजे ती स्टेजवर आहे आणि फोन डिव्हाईस वापरून खूप अक्रोड फोडत आहे. श्राद्धाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
View this post on Instagram
फोनच्या स्क्रीनवरून अक्रोड तोडतांना श्रद्धा कपूर आनंदी दिसत आहे. ‘अशीच मी माझ्या आईला सुद्धा किचनमध्ये मदत करू शकते’ असेही ती या व्हिडिओ म्हणताना दित आहे. या व्हिडिओवर संमिश्र प्रतिक्रिया येत आहे. एका युजर्सने कंमेंट्स केली आहे की, ‘श्रद्धा घरातसुद्धा तिच्या आईला अशीच मदत करत असेल.’ तर काहींनी बनावट अभिनेत्री म्हणत तिला ट्रोल केले आहे.
दरम्यान तिच्या वर्कफ्रंट बाबत सांगायचे झाल्यास, श्रद्धा तिचा पुढचा चित्रपट ‘स्त्री 2’ च्या रिलीजची आतुरतेने वाट पाहत आहे, जो 15 ऑगस्ट 2024 रोजी प्रीमियर होणार आहे. राजकुमार राव आणि श्रध्दा अभिनीत हा एक हॉरर कॉमेडी असेल. गेल्या आठवड्यात ‘मुंज्या’ सोबत या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला होता. ‘स्त्री 2’ मध्ये श्रद्धा, पंकज त्रिपाठी, राजकुमार राव, अभिषेक बॅनर्जी आणि वरुण धवन यांच्याही भूमिका आहेत.