Amol Mitkari on Sharad Pawar। लोकसभा निवडणुकीनंतर आता सर्व राजकीय पक्ष विधानसभेच्या निवडणुकीसाठी प्रयत्न करत आहेत. त्यासाठी राज्यात राजकीय हालचालींना वेग आलाय. त्यातच “अजितदादांसोबत गेलेले आमदार निधीवाटप झाल्यानंतर परत येतील, सर्वच आमदारांना पक्षबंदी नसल्याचं मोठं” वक्तव्य शरद पवारांनी केल्यानंतर आता त्यावर अजित पवार गटाकडून प्रतिक्रिया आली आहे.
अजित पवार गटाचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी,”शरद पवारांचं हे वक्तव्य केवळ संभ्रम निर्माण करण्यासाठी आहे, आमच्या आमदारांवर बारीक लक्ष असून पक्षशिस्त मोडणाऱ्यावर कारवाई करणार असल्याचे त्यांनी म्हटलंय. अजित पवार गटातील अनेक आमदार लवकरच आपल्यासोबत येणार असल्याचे संकेत शरद पवारांनी दिलेत, यावर अजित पवार गटानं प्रतुत्तर दिलंय.
संभ्रम निर्माण करण्यासाठी वक्तव्य Amol Mitkari on Sharad Pawar।
यावेळी बोलताना,”शरद पवारांचं हे वक्तव्य फक्त संभ्रम निर्माण करण्यासाठी असल्याचं राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी म्हटले. अजित पवारांसोबतचं कुणीच शरद पवारांकडे जायला तयार नसल्याने त्यांनी आता नव्या उमेदवारांची चाचपणी सुरू केल्याचे मिटकरी म्हणाले. आमच्या आमदारांवर आमचं बारीक लक्ष असून कुणी पक्षशिस्त मोडायचा प्रयत्न केला तर पक्ष त्यांच्या विरोधात कारवाई करणार असल्याचे मिटकरी यांनी स्पष्ट केले.
मिटकरींचा भाजपच्या प्रवीण दरेकरांना इशारा Amol Mitkari on Sharad Pawar।
दरम्यान, अमोल मिटकरींना आवरा असा सल्ला अजित पवारांना देणाऱ्या भाजप नेते प्रविण दरेकरांवर अमोल मिटकरींनी जोरदार प्रतिहल्ला केला. दरेकरांनीच आपलं तोंड आवरावं, माध्यमांचे कॅमेरे दिसले की दरेकर प्रसिद्धीसाठी असं बोलतात असा टोला मिटकरींनी त्यांना लगावला. अजित पवारांवर भाजपचं कुणी बोललं तर आमच्या तोंडाचा पट्टा आणखी वेगाने चालेल असा इशाराही मिटकरींनी दिला. युती धर्म पाळण्याचा ठेका फक्त राष्ट्रवादीनेच घ्यायचा का? असा सवाल मिटकरींनी दरेकरांना केला.