Amitabh Bachchan And Prabhas| ‘कल्कि 2898 एडी’ हा सिनेमा लवकरच रिलीज होणार आहे. प्रभास, अमिताभ बच्चन आणि दिपीका पदूकोण यांची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाबाबत चाहत्यांच्या मनात प्रचंड उत्सुकता आहे. २७ जूनला रिलीज होणाऱ्या या सिनेमाच्या प्री बुकिंगला सुरुवात झाली आहे.
मात्र यादरम्यान अमिताभ यांनी प्रभासच्या चाहत्यांची माफी मागितली. बिग बींनी प्रभासची माफी मागितल्याने अचानक चर्चेत आली आहे.काही दिवसांपूर्वीच पार पडलेल्या कल्की सिनेमाच्या प्रेस कॉन्फरन्सनंतर सिनेमातील कलाकार आणि निर्माते यांची एक मुलाखत घेण्यात आली.
या मुलाखतीमध्ये अमिताभ म्हणाले की, “जेव्हा सिनेमाचे दिग्दर्शक नाग अश्विन त्यांच्याकडे सिनेमाविषयी बोलण्यासाठी आले होते त्यावेळी ते एक फोटोही बरोबर घेऊन आले होते. त्या फोटोमध्ये अमिताभ यांचं पात्र प्रभासच्या पात्राला धक्का देणार होतं मी प्रभासच्या फॅन्सची हात जोडून माफी मागतो. कृपया त्यांनी मला माफ करा,” असे म्हणत अमिताभ बच्चन यांनी प्रभासच्या चाहत्यांची माफी मागितली होती. Amitabh Bachchan And Prabhas|
दरम्यान, ‘कल्कि 2898 एडी’ सिनेमात प्रभास, अमिताभ यांच्या व्यतिरिक्त दीपिका पदुकोण, कमल हासन, दिशा पाटणी, मृणाल ठाकूर, मालविका नायर, शोभना पशुपती, अन्ना बेन, ब्रह्मानंदम आणि राजेंद्र प्रसाद यांच्याही मुख्य भूमिका आहेत.
या चित्रपटाचे दिग्दर्शन नाग अश्विन करणार आहेत. तेलुगू, हिंदी, तमिळ, मल्याळम, कन्नड आणि इंग्रजी भाषांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. तर वैजयंती मुव्हीज यांनी या सिनेमाची निर्मिती केली आहे तर संतोष नारायणन यांनी या सिनेमाचं संगीत दिग्दर्शन केलं आहे. Amitabh Bachchan And Prabhas|
हेही वाचा: