Amit Shah in Parliament Session । लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या वक्तव्यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी तीव्र प्रतिक्रिया दिलीय. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना प्रत्युत्तर देताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी,” राहुल गांधी यांनी देशाची माफी मागावी असे म्हटले आहे.
त्यांनी संपूर्ण माफी मागितली पाहिजे Amit Shah in Parliament Session ।
अमित शाह यांनी आज सभागृहात विरोधी पक्षनेत्यांचे भाषण झाल्यानंतर आपली प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, विरोधी पक्षनेत्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की, जे स्वत:ला हिंदू म्हणवतात, हिंसेवर बोलतात आणि हिंसा करतात. कदाचित त्यांना माहित नसेल की या देशातील करोडो लोक अभिमानाने स्वतःला हिंदू म्हणवतात. हिंसाचाराचा संबंध कोणत्याही धर्माशी जोडणे चुकीचे आहे, त्यांनी माफी मागितली पाहिजे.” अशी मागणी केलीय.
विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या भाषणाला उत्तर देताना गृहमंत्री अमित शहा म्हणाले की, त्यांनी इस्लाममधील अभय मुद्राबाबत इस्लामच्या तज्ज्ञांचे मत घ्यावे. त्यांनी गुरू नानक देव यांच्या अभय मुद्रेवर गुरुद्वारा समितीचे मतही घ्यावे. अभयबद्दल बोलणाऱ्या या लोकांनी आणीबाणीच्या काळात संपूर्ण देशाला घाबरवले होते. आणीबाणीच्या काळात दिल्लीत दिवसाढवळ्या हजारो शीख साथीदारांची हत्या करण्यात आली होती. अमित शाह पुढे म्हणाले की, विरोधी पक्षनेत्यांनी आपल्या भाषणाबद्दल माफी मागावी.
विरोधी पक्षनेते वारंवार नियम मोडत आहेत Amit Shah in Parliament Session ।
दरम्यान, सभागृहातील विरोधी पक्षनेते राहुल गांधी म्हणाले की, हिंदू भीती, हिंसा आणि द्वेष पसरवू शकत नाहीत, परंतु भाजप द्वेष आणि हिंसाचार पसरवते. ते पुढे म्हणाले की त्यांनी (भाजप) अनेक ठिकाणी भीती पसरवली आहे. अयोध्येपासून सुरुवात करूया. असे सांगताच राहुल गांधी यांनी अयोध्येचे खासदार अवधेश प्रसाद यांच्याशी हस्तांदोलन केले. त्यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पुन्हा उभे राहिले आणि म्हणाले की, विरोधी पक्षनेते वारंवार चित्र दाखवून नियम मोडत आहेत.
हेही वाचा
‘घटनेत असं लिहिलंय का…’, महिलेला झालेल्या बेदम मारहाणीवरून कंगनाचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल