Aaliya Bhatt and Ranvir Kapoor| अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणबीर कपूर या बॉलीवूड जोडीचा फॅन फॉलोइंग खूप मोठा आहे. नुकतेच अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा दुसरा प्री-वेडिंग सेलिब्रेशन झाले. इटलीमध्ये एका क्रूझवर हे सेलिब्रेशन झाले.
अनेक सेलेब्रेटी या सेलिब्रेशन सोहळ्यात सामील झाले होते. आलिया भट्ट पती रणबीर कपूर याच्यासोबत या सोहळ्यात सहभागी झाली होती. येथील आलिया भट्टने पती रणबीर कपूरसोबतचे काही रोमॅंटिक फोटो शेअर केले आहेत.
या फोटोत अभिनेत्री आलियाने ब्लू कलरच्या गाऊनमध्ये दिसत आहे. त्यावर सिल्व्हर वर्क करण्यात आले आहे. ज्यामध्ये ती खूप सुंदर दिसत आहे. या फोटोमध्ये आलियाने रणबीर कपूर याचा हात पकडलेला दिसत आहे. यादरम्यान रणबीरने ब्लेझर, पांढरी शर्ट, पॅन्ट आणि चेहऱ्यावर मास्क घातलेला आहे. Aaliya Bhatt and Ranvir Kapoor|
View this post on Instagram
रणबीरचा लूक देखील एकदम फॉर्मल आणि क्लासी आहे. हे फोटो पोस्ट करताना आलिया भट्टने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘सनसेट क्लब’. सध्या हे फोटो चाहत्यांच्या देखील पसंतीस पडले आहेत.
दोघांच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर आलिया भट्ट लवकरच ‘जिगरा’मध्ये दिसणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत वेदांग रैना मुख्य भूमिकेत आहे. आलिया करण जोहरच्या प्रोडक्शन हाऊसच्या सहकार्याने या चित्रपटाची निर्मिती करत आहे. निर्माती म्हणून आलियाचा हा पहिलाच चित्रपट असणार आहे. Aaliya Bhatt and Ranvir Kapoor|
याशिवाय आलिया भट्ट ‘लव्ह अँड वॉर’मध्ये विकी कौशल आणि पती रणबीर कपूरसोबत दिसणार आहे. याचे दिग्दर्शन संजय लीला भन्साळी करणार आहेत. रणबीर कपूरबद्दल बोलायचे झाले, सध्या तो नितीश तिवारीच्या ‘रामायण’च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. याशिवाय तो ‘ॲनिमल 2’ आणि ‘ब्रह्मास्त्र 2’ चित्रपटांद्वारेही प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
हेही वाचा:
प्रॉफिट बुकींगचा धोका असूनही चांगली सुरुवात ; सेन्सेक्स-निफ्टी किंचित वाढीसह उघडले