Ajinkya Deo And Ashwini Bhave| मराठी सिनेमातून अभिनेता अजिंक्य देव आणि अभिनेत्री अश्विनी भावे पुन्हा एकदा एकत्र येणार आहेत. ‘घरत गणपती’ या चित्रपटातून हे दोघे दिसणार आहेत. तब्बल 25 वर्षानंतर ही जोडी एकत्र दिसणार असल्याने चाहते देखील उत्सुक आहेत. ‘सरकारनामा’ नंतर या मराठी चित्रपटाच्या निमित्ताने अजिंक्य देव आणि अश्विनी भावे एकत्र येत आहेत.
या चित्रपटात अजिंक्य देव हा शरद घरत आणि अश्विनी भावे ही अहिल्या घरतची व्यक्तिरेखा ते साकारणार आहेत. ‘श्री गणराया’च्या आगमनाच्या निमित्ताने घरत कुटुंबातल्या अनुबंधाची हलकी-फुलकी गोष्ट ‘घरत गणपती’ चित्रपटात पहायला मिळणार आहे. याआधी दोघांनी ‘शाब्बास सूनबाई’, ‘चल गंमत करू’, ‘सरकारनामा’, ‘मायेची सावली’ या सिनेमात काम केले होते. यानंतर आता पुन्हा नव्या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत.
‘घरत गणपती’ हा चित्रपट 26 जुलैला रिलीज होणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन नवज्योत नरेंद्र बांदिवडेकर यांनी केले आहे. तर कुमार मंगत पाठक, अभिषेक पाठक, नम्रता बांदिवडेकर, नवज्योत नरेंद्र बांदिवडेकर, गौरी कालेलकर-चौधरी यांनी ‘घरत गणपती’ चित्रपटाची निर्मिती केली आहे.
अश्विनी भावे, अजिंक्य देव या कलाकारांसह यात संजय मोने, शुभांगी गोखले, निकिता दत्ता, भूषण प्रधान, शुभांगी लाटकर, डॉ.शरद भुताडिया, सुषमा देशपांडे, परी तेलंग, आशिष पाथोडे, रूपेश बने, राजसी भावे, समीर खांडेकर, दिव्यलक्ष्मी मैस्नाम ही कलाकार मंडळी देखील पाहायला मिळणार आहे. दिग्गज कलाकार मंडळी असलेला हा चित्रपट पाहण्यास चाहत्यांची देखील उत्सुकता अधिक वाढली आहे.
हेही वाचा:
Odisha। जगन्नाथ मंदिराचे चारही दरवाजे उघडले