वडूज, (प्रतिनिधी) – राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 299 जयंती येथील माधवनगरमधील राजमाता अहिल्यादेवी प्रतिष्ठानच्यावतीने उत्साहात साजरी करण्यात आली. कोल्हापूर येथील वालूक गजी मंडळाच्या सदस्यांनी लयबद्ध वाद्यवादन आणि श्री राम गुरुकुल शस्त्र व शास्त्र कला मंडळाच्या लहान मुलामुलींनी निवासी प्रशिक्षण शिबिराचे प्रमुख विशाल निकम यांच्यासमवेत चार तासांहून अधिक वेळ तलवारबाजी, दांडपट्टा, लाठीकाठीची चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर केली.
यानिमित्त युवकांनी माधवनगराील मायाक्का मंदिरापासून सकाळी येथून बाइक रॅली काढली. सायंकाळी सजवलेल्या गाडीतून अहिल्यादेवी होळकर यांच्या मूर्तीची अहिल्यादेवी चौक, शिवाजी चौक, हुतात्मा स्मारक, मुख्य बाजारपेठ, शेतकरी चौक, बाजार पटांगण या मार्गाने फटाक्यांच्या आतषबाजीत मिरवणूक काढण्यात आली.
समाजबांधवांनी कार्यक्रमस्थळी मूर्तीची प्रतिष्ठापना व दीपप्रज्वलन केले. धनगर समाजाचे नेते विश्वास काळे, जागरूक ग्राहक राजा संघटनेचे जिल्हा सचिव नागनाथ स्वामी, मोहनराव देशमुख, कार्यकारी नगरसेवक तानाजी वायदंडे, श्रीकांत बनसोडे, पांडुरंग काळे, विजयकुमार काळे, हरिश्चंद्र काळे, चंद्रकांत जानकर, श्रीकांत काळे, रविराज काळे, डॉ. महेश माने, दीपक काळे, सुखदेव जानकर, राहुल सजगणे, विकास काळे, विजय सजगणे, सागर काळे,
लालासाहेब जानकर, अरविंद जानकर, मंगेश मोटे, अॅड. राहुल काळे, अॅड. सागर काळे, दिगंबर शिंगाडे, समीर गोरड, प्रथमेश काळे, प्रतीक काळे, शुभम काळे, सौरभ काळे उपस्थित होते. पोलीस उपअधीक्षक अश्विनी शेंडगे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रभाकर देशमुख यांनी कार्यक्रमस्थळी अहिल्यादेवींंच्या मूर्तीचे पूजन केले. सायंकाळी झालेल्या कार्यक्रमात शितोळेवाडी (ता. खटाव) येथील कु. विद्रोही सागवे हिने राजमाता अहिल्यादेवी यांच्या कार्याची माहिती दिली.