Vidhan Parishad Election 2024| लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्र विधान सभेच्या चार जागांसाठी आज मतदान पार पडणार आहे. मुंबई आणि कोकण पदवीधर मतदार संघ, तर नाशिक आणि मुंबई शिक्षक मतदार संघासाठी ही निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे.
सकाळी सात ते संध्याकाळी सहा या वेळेत चार जागांसाठी मतदान होईल. तर 1 जुलैला मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीसाठी महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये उमेदवारीसाठी रस्सीखेच सुरू होती. अखेर दोन्हीकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आता विधान परिषद निवडणुकीत तगडा सामना होणार असल्याचे दिसत आहे.
मुंबई शिक्षक मतदार संघामध्ये पाच उमेदवारांमध्ये लढत
1. मुंबई शिक्षक मतदारसंघासाठी शिवसेना ठाकरे गटाकडूनप्रशासनातील अनुभव असलेले अधिकारी ज. मो. अभ्यंकर यांना संधी दिली आहे.
2. भाजपने महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचं काम करणारे शिवनाथ दराडे यांना उमेदवारी दिली आहे.
3. कपिल पाटील यांच्या शिक्षक भारतीकडून सहकारी सुभाष मोरे यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
4. शिवसेना शिंदे गटानं आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं महायुतीचा धर्म न पाळता शिंदे यांनी शिवाजी शेंडगे यांना उमेदवार घोषित केलं आहे.
5. राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) उमेदवार शिवाजी नलावडे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.
मुंबई पदवीधर मतदारसंघामध्ये लढत
अनिल परब यांचा विधान परिषदेतील आमदारकीचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाकडून पुन्हा त्यांनाच मुंबई पदवीधर मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. यावेळी येथे अनिल परब यांचा भाजपच्या किरण शेलार यांच्यासोबत सामना होणार आहे.
कोकण पदवीधर मतदार संघ
सुरुवातीला मनसेने कोकण पदवीधरमधून उमेदवाराच्या नावाची घोषणा केली होती.त्यामुळे या मतदार संघाची चांगलीच चर्चा रंगली होती. मात्र भाजपकडून मनसेची मनधरणी करण्यात आल्यानंतर मनसेच्या उमेदवाराने अर्ज मागे घेतला. त्यानंतर पुन्हा एकदा भाजपकडून निरंजन डावखरे यांना संधी देण्यात आली. याशिवाय शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार किशोर जैन यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर महाविकास आघाडीकडून रमेश कीर हे उमेदवार असणार आहेत.
नाशिक शिक्षक मतदारसंघ
निवडणूकीत शिंदे गटाचे उमेदवार आणि विद्यमान आमदार किशोर दराडे, उद्धव सेनेचे उमेदवार अॅड. संदीप गुळवे, अजित पवार गटाचे महेंद्र भावसार तसेच अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांच्यात चौरंगी लढत होणार आहे.
हेही वाचा:
‘मी सहाव्यांदा खासदार झालोय.. तुम्ही आम्हाला शिकवणार का ? तुम्ही तर कृपेवर निवडून आलाय ?’