Bobby Deol । बॉबी देओल गेल्या वर्षभरापासून चर्चेत आहे. कारण आहे ‘ऍनिमल चित्रपट’. रणबीर कपूरच्या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर जबरदस्त प्रतिसाद मिळाला. या चित्रपटाने जगभरात 915 कोटींचा व्यवसाय केला. या चित्रपटात रणबीर कपूरशिवाय बॉबी देओलने चाहत्यांना खूप प्रभावित केले होते.
बॉबी देओलच्या अवघ्या 10-15 मिनिटांच्या भूमिकेतील जबरदस्त अभिनयामुळे तो सर्वांच्या आवडता बनला आहे. सध्या त्याच्या नावावर अनेक मोठे चित्रपट आहेत. काहींचे चित्रीकरण झाले असून काहींवर लवकरच काम सुरू होणार आहे. अलीकडेच बॉबी देओलने हिंदी चित्रपटसृष्टीतील काळ्या बाजूंबद्दल सांगितले. बॉबी देओल सध्या फुल ऑन डिमांड आहे. अनेक दिग्दर्शकांना त्याच्यासोबत काम करायचे आहे.. त्याला नवीन चित्रपटांच्या ऑफर येत आहेत. दरम्यान, त्यांनी एक धक्कादायक खुलासा केला आहे.
बॉबी देओलने बॉलीवूडचे काळे सत्य सांगितले. एका मुलाखतीत बॉबी देओल म्हणाला की, ‘इंडस्ट्री ज्या पद्धतीने तुमच्यावर प्रतिक्रिया देत आहे, त्यामुळे कधी कधी तुम्ही हरवले, तर तुम्हाला पुढे जाणे सोपे नसते. अशात तुम्ही सोपा आणि सुरक्षित मार्ग निवडण्यास सुरुवात करता. तो म्हणतो की या सगळ्यानंतर त्याला आव्हानांचा सामना करायचा नाही.’
“तुम्ही स्वतःला अशा परिस्थितीत ठेवू इच्छित नाही जी तुमच्या कम्फर्ट झोनच्या बाहेर आहे, कारण प्रत्येक गोष्ट काही प्रमाणात तुमच्या मनात असते. कलाकारांच्या बाबतीत जे घडते ते खेदजनक आहे. सुदैवाने मला हे कळले आणि मला त्यातून बाहेर पडायचे होते. पण अनेक अभिनेते यासाठी प्रयत्न करतात, पण तरीही त्यांना ते सांभाळता आलेले नाही. यात मी यशस्वी झालो आहे.” असेही त्याने सांगितले.