Kalki 2898 AD | Advance Booking : ‘कल्कि 2898 एडी’ हा सिनेमा लवकरच रिलीज होणार आहे. प्रभास, अमिताभ बच्चन आणि दिपीका पदूकोण यांची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाबाबत चाहत्यांच्या मनात प्रचंड उत्सुकता आहे.
उद्या 27 जूनला रिलीज होणाऱ्या या सिनेमाच्या प्री बुकिंगला सुरुवात झाली असून, सिनेमाच्या तिकिटांची किंमत 100 ते 1100 रुपयांच्या घरात आहे. मात्र एका शहरात या चित्रपटाची तिकिटे 2300 रुपयांना विकली जात आहेत.
एवढं महाग तिकीट हैदराबादमध्ये विकले जाईल असा अंदाज होता. मात्र, हे महागडे तिकीट मुंबईत विकले गेले आहे. सिनेमात अनेक मोठे स्टार असल्यानं या सिनेमाचा फर्स्ट डे फर्स्ट पाहण्यासाठी चाहत्यांनी फुल्ल तयारी केल्याचं यातून दिसून येत आहे.
View this post on Instagram
‘कल्कि 2898 एडी’ हा सिनेमा हिंदी, तमिळ आणि तेलगू भाषेत प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात प्रभाससोबत अमिताभ बच्चन, दीपिका पदुकोण, कमल हासन आणि दिशा पटानी मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.
चित्रपटाचे ॲडव्हान्स बुकिंग सुरू झाले असून चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. दिल्ली, मुंबई, बंगळुरू, चेन्नई आणि हैदराबादमध्ये पहिल्या दिवसाच्या शोसाठी अनेक चाहत्यांनी तिकिटे बुक केली आहेत.