पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – कौटुंबिक न्यायालयातील वकिलांची संघटना असलेल्या द फॅमिली कोर्ट लॉयर्स असोसिएशन, पुणेच्या अध्यक्षपदी ॲड. गणेश कवडे यांची निवड झाली आहे. त्यांनी यापूर्वी या संघटनेचे अध्यक्ष म्हणून काम केले आहे. या निवडणुकीत ३०३ मतदापैंकी २७६ जणांनी मतदानाचा हक्क बजावला.
त्यापैकी १७० मते घेत ॲड. कवडे विजयी झाले. याशिवाय त्यांच्या एकता परिवर्तन पॅनेलचे सर्व पदाचे सर्व उमेदवार विजयी झाले. उपाध्यक्ष पदी ॲड. स्मिता देशपांडे, ॲड. कल्पना डिसले-निकम, सचिव पदी ॲड. प्रथमेश भोईटे, सहसचिव पदी ॲड.
कोमल देशमुख, खजिनदार पदी ॲड. भूषण कुलकर्णी, सदस्य पदी ॲड. अश्मा मुलाणी, ॲड.अजित कदम, ॲड. जुही कुरेशी, ॲड. शर्वरी भंडारी आणि ॲड. राहुल जाधव-देशमुख हे विजयी झाले आहेत.
ॲड. अमृता गुरव देशमुख यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले. तब्बल दहा वर्षानंतर द फॅमिली कोर्ट लायर्सचे जाहीर निवडणूक लागली होती. वकिलांच्या विकासासाठी कार्य करणार असल्याचे निवडीनंतर ॲड. कवडे यांनी सांगितले. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा लवकरच पदग्रहण सोहळा होणार आहे.