Aditi Sarangdhar On Trolling | अभिनेत्री आदिती सारंगधरने नाटक, चित्रपटांसह मालिकांमध्ये काम केले आहे. तिच्या ‘वादळवाट’ या मालिकेतील भूमिकेला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. मात्र नुकतेच तिने एका मुलाखतीतमध्ये केलेले विधान चांगलेच चर्चेत आले होते. गरोदर असताना तिला बिअर प्यायचे डोहाळे लागले होते, असे तिने सांगितले होते. यानंतर तिला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आले.
यानंतर आता तिने ट्रोल करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिले आहे. “मला बिअरचे डोहाळे लागले होते. मी काही घटाघटा बिअर प्यायले नाही. मी कधीही मद्य घेत नाही. मी कधीही ड्रिंक्स घेत नाही. पार्टी असेल तरीही मी सात वाजता झोपलेली असते. पण जेव्हा गरोदर होते तेव्हा मला जे वाटलं ते वाटलं. मी त्या काळात थंड पाणीही पित होते. इतकं थंड पाणी मी कधीही प्यायले नव्हते,” असं म्हणत आदिती सारंगधरने ट्रोलिंगवर स्पष्टीकरण दिले.
आदिती काय म्हणाली होती?
एका युट्यूब चॅनलला आदितीने मुलाखत दिली होती. यात तिने म्हंटले होते की, “जेव्हा मी गरोदर होते तेव्हा मला बिअर प्यायचे डोहाळे लागले होते. त्या दिवसांमध्ये मी सॅलेड खायचे आणि बिअर प्यायचे. जर बिअर प्यायले नाही तर कसंतरीच व्हायचे. मी याबाबत डॉक्टरांना विचारले. त्यावेळी मला डॉक्टर म्हणाले दोन दोन घोट प्या. मग मी नऊ महिने दोन-तीन घोट बिअर प्यायच,” असं आदिती म्हणाली होती. ज्यामुळे तिला ट्रोल करण्यास सुरुवात झाली होती. Aditi Sarangdhar On Trolling |
हेही वाचा :
मणिपूर हिंसाचारात खलिस्तानी कनेक्शन ; यूकेच्या प्राध्यापकाविरोधात FIR दाखल