Aditi Rao Hydari Slams British Airways| संजय लीला भन्साळी यांची ‘हीरामंडी : द डायमंड बाजार’ ही वेब सीरिज सुपरहिट ठरली. यातील सर्व अभिनेत्रींना या सीरिजमुळे मोठी लोकप्रियता मिळाली. यात अभिनेत्री अदिती राव हैदरी हिने देखील काम केले. यातील तिच्या ‘बिब्बोजान’ ह्या भूमिकेला प्रेक्षकांची मोठी पसंती मिळाली. मात्र आता आदितीने सोशल मीडियावर शेअर केलेली पोस्ट चांगलीच चर्चेत आली आहे.
आदितीला लंडनमध्ये प्रवास करताना खूप वाईट अनुभव आला. गेल्या 17 तासांहून अधिक वेळ अदितीला एअरपोर्टवर तिच्या सामानाची प्रतीक्षा करावी लागली. याबाबत तिने पोस्ट शेअर करत मनस्ताप व्यक्त केला आहे. आदितीसह तिच्यासोबत प्रवास करणाऱ्या सहप्रवाशांचे सामान चेकआऊट केल्यावर न मिळाल्याने तिने हिथ्रो विमानतळ आणि एका नामांकित एअरवेज विरोधात एक्स पोस्ट शेअर करत संताप व्यक्त केला आहे.
17 hours later…
the saga continues! @British_Airways …. Slow clap!
Still waiting…. Suitcase please! 🙏🏻
Also to everyone sending me messages about @British_Airways ‘
… I feel your pain!at this point I just need my suitcase 🙏🏻
(And for all the passengers who are… https://t.co/rfCO2m9OE1
— Aditi Rao Hydari (@aditiraohydari) June 26, 2024
अभिनेत्रीने सोशल मीडियावर काही पोस्टही शेअर केल्या आहेत. “17 तास झाले आहेत आणि मी अजूनही वाट पाहत आहे. माझे सामान कुठे आहे? मात्र, त्यांना आणखी किती प्रतीक्षा करावी लागली, याबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही,” असे तिने म्हंटले आहे. Aditi Rao Hydari Slams British Airways|
दरम्यान, ‘हीरामंडी: द डायमंड बाजार’ वेबसिरीजमध्ये अदिती राव हैदरीशिवाय सोनाक्षी सिन्हा, मनीषा कोईराला, रिचा चढ्ढा, संजीदा शेख, शर्मीन सहगल यांच्याही महत्त्वाच्या भूमिका होत्या. यातील गाणी आणि अभिनेत्रींचा पेहराव अनेकांच्या पसंतीस पडला. Aditi Rao Hydari Slams British Airways|
हेही वाचा: