Rupali Bhosale New Home| मराठमोळी अभिनेत्री रूपाली भोसले सध्या ‘आई कुठे काय करते’ यामालिकेत संजनाच्या भूमिकेत पहायला मिळत आहे. यातील तिची लोकप्रिय ठरली. तिने हिंदीसह मराठी मालिकांमध्ये काम केले आहे. अत्यंत खडतर परिस्थितीतून रुपालीने यश संपादन केले आहे. पाली भोसलेनं नुकतंच स्वतःच्या मालकीचं हक्काचं घर घेतलं आहे. कालच तिने या घराची वास्तुशांती केली. याचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
रुपालीने जवळच्या नातेवाईकांच्या उपस्थितीत पारंपरिक पद्धतीने घराची वास्तुशांती केली. यावेळी अभिनेता अभिषेक देशमुख, गौरी कुलकर्णी, सुशांत शेलार, अभिजीत केळकर अशा अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. रुपालीच्या घराच्या वास्तुशांतीच्या कार्यक्रमातील भजनात सुशांत दंग झालेला पाहायला मिळाला. रुपालीच्या घराच्या नेमप्लेटवर ‘प्रकाश प्रज्ञा संकेत भोसले’ असं तिच्या बाबांचं, आईचं आणि भावाचं नाव लिहिलेलं आहे.
सोशल मीडियावर तिने घराची झलकही दाखवली आहे. अभिनेत्रीच्या घरातील देव्हारा अतिशय सुंदर आहे. रुपालीने तिला मिळालेले पुरस्कार एक एक कप्प्यात रचून ठेवले आहेत. सध्या तिच्या या पोस्टवर चाहत्यांसह कलाकार देखील तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.