Rasika Sunil| अभिनेत्री रसिका सुनीलने मालिकांसह चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. झी मराठी वाहिनीवरील ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेतून ती घराघरात पोहचली. यात तिची खलनायिकेची भूमिका चांगलीच गाजली. यानंतर आता रसिका चित्रपटाद्वारे पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. आगामी ‘डंका…हरीनामाचा’ या चित्रपटातही ती डॅशिंग भूमिकेत दिसणार आहे. नुकतेच तिचे पोस्टर प्रदर्शित झाले आहे. यातील तिचा लुक सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
या चित्रपटात ती झाशा या व्यक्तिरेखेत दिसणार आहे. भावासोबत झालेल्या अन्यायाचा बदला झाशा कशी घेते? हे या चित्रपटात दाखवण्यात येणार आहे. या भूमिकेबद्दल रसिकाने आनंद देखील व्यक्त केला. दरम्यान, रुद्र एंटरटेन्मेंट स्टुडिओज् आणि गणराज स्टुडिओज् प्रस्तुत ‘डंका… हरिनामाचा’ या चित्रपटाची निर्मिती रवींद्र फड यांनी केली आहे. लेखन आणि दिग्दर्शन श्रेयश जाधव यांनी केले आहे. Rasika Sunil|
View this post on Instagram
या चित्रपटामध्ये अनिकेत विश्वासराव सोबत सयाजी शिंदे, प्रियदर्शन जाधव, अविनाश नारकर, किरण गायकवाड, अक्षया गुरव, निखिल चव्हाण, मयूर पवार, किरण भालेराव, कबीर दुहान सिंग, महेश जाधव यांच्या देखील भूमिका असणार आहेत. हा चित्रपट १९ जुलै रोजी चित्रपटगृहात पाहता येणार आहे. Rasika Sunil|
दरम्यान, रसिकाने आपल्या अभिनयाच्या जोरावर मराठी सिनेइंडस्ट्रीत मोठे नाव मिळवले आहे. मालिका आणि चित्रपटांमध्ये काम करण्यासह ती सूत्रसंचालन करताना देखील पहायला मिळाली. सोशल मीडियावर देखील तिचा मोठा चाहता वर्ग आहे. यानंतर आता ती पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज झाली आहे.
हेही वाचा:
पत्र्यावर पडलेला बॉल काढणं जीवावर बेतलं ; विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुरड्याचा मृत्यू