Manva Naik Emotional Post | मराठमोळी अभिनेत्री मनवा नाईक अभिनेत्रीसह एक दिग्दर्शिका आणि निर्माती देखील आहे. सोशल मीडियावर देखील सक्रिय असल्याचे दिसते. नुकतेच तिने इनस्टाग्रामवर एक भावुक पोस्ट शेअर केली आहे. हे. ‘सोनी मराठी’ वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘कारण गुन्ह्याला माफी नाही’चा सहाय्यक दिग्दर्शक गौरव काशिदेचं गंभीर अपघातात निधन झाले आहे. गौरवच्या निधनाविषयी माहिती देत मनवाने भावनिक पोस्ट शेअर केली आहे.
मनवा नाईकने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून गौरव काशिदेचा फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले की “गौरव काशिदे. एक खूप मेहनती आणि तरुण मुलगा जो आमच्यासोबत तुमची मुलगी काय करते पासून ते कारण गुन्ह्याला माफी नाही पर्यंत साहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करत होता. 26 वर्षाच्या या मुलानं एक नवीन बाईक घेतली आणि त्यानंतर आयफोन घेतला त्यामुळे तो उत्साही होता. त्यांच्या कुटुंबातील तो सगळ्यांचा लाडका होता, जो संपूर्ण कुटुंबाला त्याच्यावर गर्व होईल असं काम करणार होता.’
View this post on Instagram
पुढे मनवा म्हणाली, ’10 जून रोजी त्याचा वाढदिवस होता. त्यादिवशी संध्याकाळी सगळं काम संपवून जेव्हा आपण मुंबईकर पाऊस आल्याचा आनंद घेत होतो. त्यावेळी गौरव वाकोला पुलाजवळ रस्त्याच्या मध्ये उभ्या असलेल्या खासगी बसला जाऊन जोरात धडकला. या भीषण अपघातात तो गंभीर जखमी झाला आणि त्याच्यावर मेंदूची शस्त्रक्रिया करण्यात आली. जवळपास १० दिवस तो आयसीयूमध्ये मृत्यूशी संघर्ष करत होता. पण शेवटी त्याचा मृत्यू झाला आणि आम्ही गौरवला गमावलं.
पोलिसांनी तक्रार करुन घेतल्याचे सांगत मनवा पुढे म्हणाली, ‘पोलिसांनी त्या खासगी बस ड्रायव्हर विरोधात तक्रार दाखल केली. त्यानंतर इन्शुरन्स देणारी व्यक्ती समोर आली. पोलिसांनी या सगळ्या घटनेसाठी बस ड्रायव्हर दोषी असल्याचे सांगितले कारण ती बस रस्त्याच्या कडेला न थांबता मध्येच थांबली होती. पण आता त्यात काय अर्थ आहे? आम्ही गौरवला गमावलं… हे सगळं टाईप करत असताना मला अजूनही तो या या असा आवाज ऐकायला येतोय. मुला तुझ्या आत्म्याला शांती मिळो.’
दरम्यान, मनवा नाईकच्या या पोस्टवर कमेंट करत दु:ख व्यक्त केले आहे. सहाय्यक दिग्दर्शक गौरव काशिदेच्या अचानक जाण्याने मराठी मालिकाविश्वात शोककळा पसरली. अनेक कलाकारांनी गौरवला श्रद्धांजली वाहिली आहे.
हेही वाचा:
पेपरफुटी प्रकरणाचा तपास करण्यास गेलेल्या सीबीआयच्या टीमवर हल्ला; नेमकं काय घडलं?