स्टार प्रवाह वाहिनीवरील प्रसिद्ध मालिका ठरलं तर मग या कार्यक्रमातील एका कलाकारचं अपघाती निधन झाले. गौरव काशिदे असे मृत पावलेल्या कलाकाराचे नाव आहे. तो अवघा २४ वर्षांचा होता. च्या निधनाच्या बातमीमुळे ठरलं तर मग मालिकेच्या सेटवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्याच्या निधनानंतर अभिनेत्री जुई गडकरी हिने सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट केली आहे. तिने तिच्या या पोस्टमध्ये गौरवविषयीच्या अनेक गोष्टी मांडल्या आहेत.
काय लिहिले पोस्टमध्ये?
जुईने तिच्या सोशल मीडियवर गौरवचा एका फोटो शेअर केलाय. यामध्ये तिने लिहिले कि, गौरवच्या वाढदिवसाच्या आदल्या दिवशी तो बाईकवरुन घरी जात होता. 9 तारखेच्या रात्री गौरवच्या बाईकच्या भीषण अपघात झाला. “ताई मला कोणी ऊठवलंच नाही, म्हणुन लेट झाला यायला!” हे त्याचं पहिलं वाक्य होतं आमचं युनिट जॅाईन केल्यावर! पहिल्याच दिवशी लेट आला होता तो! मग रुळत गेला हळुहळु..सिन चे que देताना जर ते character पळत आलेलें आसेल तर तो पळुन पण दाखवायचा.. हुषार होता… मला रोजचे सिन explain करायचा.. हसतमुख होता… मेहनती होता.. त्या वयात मुलं असतात तसा अल्हड पण होता… मला थोडा घाबरायचा म्हणुन “ताईसमोर स्मोक करुन गेलं कि ताई लगेच ओळखते आणि ओरडते…त्यापेक्षा नाही करत स्मोक” असं म्हणुन निदान तेवढ्यापुरतं तरी टाळायचा… गुणी मुलगा होता..
पुढे तिने म्हटलं की, रात्री घरी जाताना आमच्या दुसर्या एका female AD ला आणि hair dresser ला घरी सोडुन जायचा… त्या ही रात्री तो त्या दोघिंना चारकोप ला सोडुन पुढे गेला… त्या दिवशी नेमकी आमची hairdresser चारकोपलाच ऊतरली… नाहीतर ती रोज त्याच्याबरोबर माहिम पर्यंत जायची… आणि तो तिला न्यायचं म्हणुन गाडी सांभाळुन चालवायचा…त्याचा २४ वा वाढदिवस होता १०जुन ला… ९तारखेला त्याच्या बाईकचा बॅंड्रा मध्ये भिषण अपघात झाला… त्याच्या ब्रेनला जबरदस्त मार लागला होता… त्याला आमच्या सेटवर येऊन जेमतेम महिनाभरच झाला होता.. पण सगळ्यांशी त्यानी छान नातं जोडलं होतं… गेले अनेक दिवस तो Coma मध्ये होता… आणि काल त्याची मृत्युशी असलेली झुंज अखेर संपली… सेटवर सगळे अजुनही सुन्न आहेत… सगळ्यांना वाटत होतं गैरव परत येईल…गैरव, काल पण तुला कोणीतरी ऊठवायला हवं होतं रे.. तु लेट आला असतास… पण आला तरी असतास… तुझ्या आतम्याला शांती मिळो हे तरी कसं लिहायचं?त्या आई बाबांचं आज काय झालं असेल याचा विचारही करु शकत नाही.