Debina Bonerjee | छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री देबिना बॅनर्जी सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. आपल्या दोन चिमुकल्या मुलींसोबत ती सध्या वेळ घालवत आहे. त्यांच्यासोबतचे अनेक व्हिडिओ आणि फोटो ती सोशल मीडियावर शेअर करते. मात्र आता देबिनाला पुन्हा एकदा आजाराचा सामना करावा लागत आहे. देबिनाने तिला एंडोमेट्रियोसिस हा आजार झाल्याचे सांगितले आहे. मुलीच्या जन्माआधी तिला या आजाराचं निदान झालं. आता तिला पुन्हा त्याच समस्येला सामोरं जावं लागत आहे.
देबिनाने ब्लॉगवर या आजाराबाबतची माहिती दिली आहे. देबिना म्हणते, “मला काहीच करण्याची इच्छा होत नाही. एंडोमेट्रियोसिस असा आजार आहे जो कधीच तुमची पाठ सोडत नाही. यासाठी एक छोटं ऑपरेशन करण्याची गरज आहे, पण तरी हा आजार पुन्हा उद्भवत आहे. यासाठी मी कधीच गोळ्या औषधं घेत नाही. वेदना कमी करण्यासाठी गोळ्या घेणं मला आवडत नाही.”
ती पुढे म्हणाली, “पिरियड्समध्ये त्रास होणं हे नॉर्मल नाही. मला हे माहित नव्हतं कारण मला कधीच पिरियड्समध्ये त्रास झाला नाही. जेव्हा मी इतर मुलींच्या त्रासाबद्दल ऐकायचे तेव्हा मला बरं वाटायचं की मला त्रास होत नाही. लियानाच्या जन्माच्या काही वर्षांआधी मला पिरियड्समध्ये त्रास व्हायला लागला. तेव्हा मला समजलं की मला एंडोमेट्रियोसिस आणि ए़डेनोमायोसिसचं निदान झालं आहे. हा गर्भाशयाचा आजार आहे.” Debina Bonerjee |
पुढे तिने सांगितले की, “मला ग्रेड 4 एंडोमेट्रियोसिस आणि ए़डेनोमायोसिस असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आणि गेल्या २-३ महिन्यांपासून तो त्रास पुन्हा सुरु झाला आहे. मी घरात राहूनही आराम करू शकत नाही. कारण मला सतत त्या वेदनांची जाणीव होतेमी घरी बसून आराम करत राहिले तर मला वेदना जास्त जाणवतील, ” असंही ती म्हणाली. Debina Bonerjee |
दरम्यान, देबिना आणि गुरमीत चौधरी 2009 साली लग्नबंधनात अडकले. देबिना लग्नाच्या तब्बल 11 वर्षानंतर 3 एप्रिल 2022 रोजी आई झाली. पहिल्या बाळाला जन्म दिल्यानंतर अवघ्या 7 महिन्यांत ती पुन्हा आई झाली होती. यावरूनही तिला खूप ट्रोल करण्यात आले होते. मात्र तेव्हा तिने टीका करणाऱ्यांना चांगलेच सुनावले होते. Debina Bonerjee |
हेही वाचा:
पुणे शहराचा लौकिक कायम राखणार; पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचे प्रतिपादन