Entertainment । अभिनेत्री अनन्या पांडे ही बॉलिवूडमधील फॅशनेबल अभिनेत्रींपैकी एक आहे. अभिनेत्री प्रत्येक इव्हेंटमध्ये जबरदस्त फॅशन कॅरी करत असते. तिच्या स्टाइलने ती लोकांना वेड लावते. सध्या अभिनेत्री तिच्या ‘कॉल मी बे’ या वेब सीरिजमुळे चर्चेत आहे. अशात अनन्या नुकताच तिच्या स्टायलिश लूक चाहत्यांसोबत शेअर केला आहे. ज्यामध्ये अनन्याच्या किलर पोज देताना दिसत आहे.
अनन्याने लाल रंगाचा ड्रेस परिधान केलेले असून तिचे हा फोटो इंस्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. ज्यात तिच्या गळ्यात बांधलेल्या लाल गुलाबाने सगळी सर्वांचे लक्ष वेधून घेते.अनन्या पांडे येथे कस्टम कॉर्सेट टॉप आणि एसेल लेबलचा ड्रेप स्कर्ट परिधान करताना दिसत आहे. अनन्याची किलर स्टाईल पाहण्यासारखी आहे, यामध्ये तिला मोहित राय आणि शुभी कुमार यांनी उत्तम प्रकारे स्टाइल केली आहे.
अनन्याने फ्रिल डिझाइनद्वारे प्रेरित लाल कॉर्सेट टॉपसह सॅटिन ड्रेप केलेला स्कर्ट जोडला आहे. ज्यावर सॅटिन रेड रोझने डिटेलिंग केले आहे. अनन्याने त्याला मॅचिंग चोकरने स्टाइल करून कहर निर्माण केला आहे. या लाल चमकदार पोशाखात अनन्या खूप सुंदर दिसत आहे. लाल सॅन्डलसह लाल ड्रेस आणि काळ्या अँकलेट्सने लुकमध्ये आकर्षण वाढवले. अनन्याने ग्लॉसी मेकअपसह तिचा हॉटनेसचा लूक पूर्ण केला आहे. सोशलवर तिच्या या लूकवर चाहते प्रेमाचा वर्षाव करत आहे. या फोटोला काही क्षणातच लाखोंचा घरात लाईक मिळाले आहे.
अनन्या पांडेच्या वर्क फ्रंटबाबत सांगायचे झाल्यास, ती शेवटची ‘खो गये हम कहाँ’ या चित्रपटात दिसली होती, ज्यामध्ये तिच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले होते. सध्या अनन्या ‘कंट्रोल’ चित्रपटाचे शूटिंग करत आहे. विक्रमादित्य मोटवानी या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. याशिवाय अक्षय कुमार आणि आर माधवनसोबत अनन्या पांडेही ‘शंकारा’ चित्रपटात दिसणार आहे.