पुणे, {प्रभात वृत्तसेवा} : फर्ग्युसन रस्त्यावरील ‘लिक्विड लिझर लाउंज’ (एल-३) बारमध्ये झालेल्या वादग्रस्त पार्टी प्रकरणी अटक करण्यात आलेल्या बार मालक, चालक, पार्टी आयोजक आणि अमली पदार्थ आरोपी यांचा एक दुसऱ्यांशी संपर्क होता.
सगळ्यांनी मिळून पार्टीचे आयोजन केले होते. अटक करण्यात आलेल्या आरोपींने शहरातील इतर बार, पब मध्ये ड्रग्स दिल्याची शक्यता आहे. त्यामुळे या सगळ्यांना सामोरासमोर बसवून तपास करायचा असल्याचे पुणे पोलिसांनी न्यायालयात सांगितले.
एल-३ बार मध्ये पहाटे उशीरपर्यंत सुरू असल्याचे, तसेच तेथे अमली पदार्थांचे सेवन केले जात असल्याची चित्रफीत प्रसारित झाल्यानंतर पोलिसांनी अटक केलेल्या बारच्या जागेचे मालक संतोष विठ्ठल कामठे (रा. रंजनीगंध अपार्टमेंट शिवाजीनगर), बार चालविण्यासाठी घेतलेले उत्कर्ष कालिदास देशमाने (रा. मुंजाबा वस्ती धानोरी),
योगेंद्र गिरासे (रा. भूगाव), रवी माहेश्वरी (रा. उंड्री), पार्टीचे आयोजन केलेला अक्षय दत्तात्रेय कामठे (रा. हडपसर), डिजे दिनेश मानकर (रा. नाना पेठ), रोहन राजू गायकवाड (रा. भोसले पार्क, हडपसर), मानस पस्कूल मल्लिक (वय ३३, रा. येरवडा),
नितीन नथुराम ठोंबरे (वय-३४, रा. गोरेगाव इस्ट), करण राजेंद्र मिश्रा (वय-३४, रा. मुंढवा) यांच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्याने त्यांना न्यायालयात हजर केले. त्यावेळी त्यांच्या पोलीस कोठडीत २ जुलै पर्यंत वाढ करण्याचे आदेश अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी ए. यू. सुपेकर यांनी दिले.
त्यावेळी तपास अधिकारी चंद्रशेखर सावंत यांनी सांगितले की, एल-३ बार मधील पार्टी मध्ये एम डी ड्रग्स वापरल्याचे आरोपी अभिषेख सोनावणे याने सांगितले आहे. तसेच, आरोपींनी पार्टी करण्याच्या कट कोठे रचला व कधी केला,
आरोपींना अमली पदार्थ पुरविणारे ड्रग्स पेडलर, त्यांच्या मुख्य मोरक्या कोण आहे. सर्व आरोपींकडे ड्रग्स पुरविणारे, आजपर्यंत आयोजित करण्यात आलेल्या ड्रग्स पार्ट्या संदर्भात माहिती घ्यायची आहे.
आरोपी ठोंबरे आणि मिश्रा याने अभिषेख सोनावणेकडून ड्रग्स घेतल्याचे तपासात समोर आले आहे. इतर आरोपींनी सुद्धा सोनावणेकडून ड्रग्स घेतल्याची शक्यता आहे, तसेच इतर अटक आरोपीकडून चरस, गांजा, एमडी सारखे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत,
ते कुठून आणले, कोणी दिले त्यांचे इतर साथीदार याचा तपास करायचा असल्याचे सावंत सांगितले. त्यामुळे आरोपींना सात दिवसांची पोलीस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकील प्रियांका वेंगुर्लेकर यांनी केली. आरोपींच्यावतीने अ ॅड. सुधीर शहा, ॅअड. राजेश कातोरे, अ ॅड. संजीव कुमार,अ ॅड. अमेय बलकवडे,अ ॅड. आर. एल. मते यांनी बाजू मांडली.